Fashion Tips : जीन्सची खरेदी करताना या टिप्स फॉलो करा

जीन्स खरेदी करताय तर या गोष्टींची आवर्जून काळजी घ्या.
Fashion tips in Marathi
Fashion tips in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजकाल जीन्स ही सर्व वयोगटातील लोकांमध्ये अतिशय ट्रेंडिंग फॅशन (Fashion) बनली आहे. सर्वाधिक जीन्स घालण्याची आवड ही पुरुषांना आहे. परंतु, प्रत्येक जीन्सची स्टाईल ही सगळ्यांना चांगली दिसत नाही. म्हणून, जीन्स निवडताना ती योग्य प्रकारे निवडावी. जीन्स खरेदी करताना शरीराचा आकार, रंग आणि ट्रेंड यासारख्या काही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून आपण आपल्यासाठी परफेक्ट जीन्स निवडू शकतो. (Fashion tips in Marathi)

हे देखील पहा -

सध्याच्या फॅशनच्या आणि चांगल्या दिसण्याच्या युगात जीन्स घालणे अगदी साधी गोष्ट आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक महिला व पुरुष वर्ग स्मार्ट लूक मिळविण्यासाठी जीन्स घालणे पसंत करतात. परंतु, सर्व प्रकारच्या जीन्स सर्वांनाच शोभतील असे नाही. अशा परिस्थितीत जीन्स खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःसाठी उत्तम जीन्स निवडू शकता.

जीन्स निवडताना या गोष्टीकडे लक्ष द्या.

१. जीन्स खरेदी करताना शरीराच्या आकाराकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमची उंची चांगली असेल आणि तुम्ही सडपातळ असाल तर स्कीनी आणि स्ट्रेट लेग जीन्स तुमच्या शरीरयष्टीला छान दिसेल. तर दुसरीकडे, पीअर शेप बॉडीसाठी कर्व्ही फिट जीन्स चांगली दिसेल. तसेच, तुमचे शरीर जाड असाले तर, हाय राइज जीन्सची निवड करा त्यामुळे तुम्ही बारीक दिसाल.

Fashion tips in Marathi
मेकअप ब्रश की, ब्युटी ब्लेंडर स्पंज चेहऱ्यासाठी योग्य अयोग्य काय ?

२. जीन्स खरेदी करताना फॅशन ट्रेंड (Trend) लक्षात ठेवा. यासाठी नेहमी फॅशनमध्ये असणारी हाय राइज जीन्स किंवा स्ट्रेट लेग जीन्स खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

३. जीन्स खरेदी करताना त्याच्या आकारा आणि रंगासोबतच फॅब्रिककडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अशावेळी फक्त सॉफ्ट टच असलेली स्ट्रेचेबल जीन्स खरेदी करु शकता. तसेच फॅब्रिकसह जीन्स बऱ्याच काळासाठी खराब होत नाहीत आणि घालण्यासाठी आरामदायी देखील आहे.

४. जीन्सचा रंग निवडताना गोंधळत असाल तर, निळा आणि काळा डेनिम हे दोन्ही रंग प्रत्येकाला साजेशीर आहेत. तुम्ही कॅज्युअल आउटफिट्सपासून पार्टी (Party) वेअरपर्यंत ब्लू डेनिम जीन्स ट्राय करू शकता. तसेच, काळ्या जीन्स ह्या रात्रीच्या पार्टीमध्ये खूप क्लासिक लुक देतात.

५. जीन्स खरेदी केल्यानंतर त्यावर तुमच्या आवडीचे फिटिंग निवडा. फिटिंग निवडताना ते जीन्सच्या रंगाला सूट होत आहे की, नाही हे देखील पहा.

अशाप्रकारे खरेदीला जाताना जीन्सची योग्य निवड करू शकता.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com