केसांनुसार हेअर ब्रश निवडताना या टिप्स फॉलो करा

आपल्या केसांच्या गरजेनुसार योग्य हेअर ब्रश असा निवडा.
Hair tips in Marathi, hair care tips, How to choose brush for hair
Hair tips in Marathi, hair care tips, How to choose brush for hairब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या शरीर सौदर्यांत अधिक भर पडते ती केसांमुळे. आपण केस वाढवण्यासाठी किंवा केसांच्या इतर तक्रारीसाठी आपण नवनवीन प्रयोग करत असतो. (Hair care tips)

हे देखील पहा -

केसांचा विचार करताना आपण हेअर ब्रशचा देखील विचार करावा. ब्रश खरेदी (Shopping) करताना त्यात अनेक प्रकारचे स्टायलीश ब्रश असतात परंतु, कोणता ब्रश आपल्या केसांसाठी योग्य आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे केसांमध्ये कोंडा किंवा इतर संसर्ग आपल्याला होतात. त्यासाठी आपण वेगवेगळ्या केसांच्या गरजेनुसार वेगवेगळे हेअर ब्रश निवडले पाहिजेत. प्रत्येकाचे केस वेगवेगळे असल्याने, कोणत्याही केसांचा ब्रश निवडण्यापूर्वी आपल्या केसांची चाचणी करुन पहा. हेअर ब्रश निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या ते पाहूया. (how to know what hair brush to use)

१. केसांसाठी ब्रश निवडताना पॅडल ब्रश आपण घेऊ शकतो. या ब्रशचा तळाचा भाग मऊ असतो आणि हा ब्रश टाळूला मसाज करण्याचे काम करतो. स्ट्रेटनिंग वापरण्यापूर्वीही हा ब्रश उत्तम काम करतो.

Hair tips in Marathi, hair care tips, How to choose brush for hair
स्ट्रेटनर वापरल्यानंतर कोरड्या झालेल्या केसांची काळजी कशी घ्याल

२. आपले केस (Hair) कर्ल करण्यासाठी आपण गोल ब्रशचा वापर करु शकतो. हा ब्रश वेगवेगळ्या बॅरल आकारात येतो. अशावेळी आपण केसांच्या गरजेनुसार गोल ब्रश निवडा. जर आपल्याला कर्ल करायचे असतील तर लहान गोल ब्रश निवडा, तर सैल कर्लसाठी मोठा गोल ब्रश निवडणे चांगले.

३. केस ओले असताना रुंद-दात असलेला ब्रश वापरावा, त्यामुळे केस तुटत नाही. गुंता आणि गाठीपासून मुक्त होणे सोपे करते.

४. टीझिंग कॉम्ब आपल्या केसांसाठी कडक असू शकतो, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे बॅककॉम्बिंगसाठी टीझिंग ब्रश वापरणे चांगले असते. या प्रकारच्या ब्रशचा आपल्या हेअरस्टाईलमध्ये व्हॉल्यूम वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com