
Moonglet Recipe : सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी महिलांना फार विचार करावा लागतो. त्यासोबतच नाश्ता चविष्ट देखील असायला हवा. त्यामुळे तुम्ही मूग डाळीपासून मुगलेट बनवू शकता. हा नाश्ता मुलांना नक्कीच आवडेल.
मुगलेट चविष्ट आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. हा पदार्थ (Food) बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. त्यामुळे कार्यालयीन महिलांसाठीही (Women) हा पदार्थ बनवणे कठीण जाणार नाही. मुगलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. प्रथिने, कॅल्शियम, लोह यांचे भरपूर प्रमाण मुगलेट या अन्नपदार्थांमध्ये आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि स्नायूंना होणारा त्रासही कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया मुंगलेट्स ही चविष्ट रेसिपी बनवण्याची पद्धत.
2. पद्धत
मुंगलेट्स बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मूग डाळ पूर्णपणे धुवून दोन तासांसाठी पाण्यात भिजत ठेवावी लागेल.
आता बीटरूट टोमॅटो आणि इतर भाज्या बारीक चिरून एका बाउलमध्ये ठेवा.
त्यानंतर मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता त्यात आल्याचे तुकडे आणि सोबत थोडे पाणी घाला.
मूग डाळ बारीक करून तयार केलेल्या पेस्टमध्ये हळद, बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
आता एका वाटीत तयार केलेले मिश्रण घेऊन तव्याच्या मध्यभागी टाका आणि गोलाकार पसरवून घ्या.
आता थोडे शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला भाज्या ठेवा आणि नंतर चाट मसाला शिंपडा.
त्यानंतर रोल बनवून दोन्ही बाजूने गोल्डन झाल्यानंतर गॅस बंद करा. हे तयार मुंगलेट्स तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.