Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पासाठी बनवा यापद्धतीने झटपट मखर, सजावटीच्या खास आयडीया पाहा

Ganpati Festival 2023 : बाप्पाच्या सजावटीसाठी या टीप्सचा वापर करा.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam Tv

Ganesh Chaturthi Decoration Ideas

येत्या आठवड्यात गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. बाप्पा येणार म्हटल्यावर बाप्पासाठी छान सजावट करायला हवी. बाप्पाला विराजमान करण्यासाठी छान आसन सजवायला हवे. अशाच काही सजावटीच्या आयडिया आम्ही तुम्हाला देणार आहोत.

बाप्पासाठी सर्वजण काही न काही वेगळं करण्याच्या प्रयत्न करतात. बाप्पासोबतच आपले घरही रोशनाईने भरुन जाते. बाप्पा येणार म्हटल्यावर सर्वजण एकत्र येतात. सजावटीची तयारी करतात. काही खास सजावट करतात. तुमच्या सजावटीसाठी या लहान टीप्सचा वापर करा.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Puja List : गणेश पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? पाहा लिस्ट

1. रंगीत कागदांची सजावट

गणपती बाप्पाच्या स्वागताच्या सजावटीसाठी तुम्ही रंगीत कागद वापरु शकता. रंगीत कागद वापरुन वेगवेगळी फुले बनवू शकता. संपूर्ण घरभर ही फुले चिटकवता येतील. तसेच बाप्पाच्या मखराच्या आजूबाजूला रंगीत फुलपाखरे बनवू शकता. त्यावर वेगवेगळी डिझाइन काढल्याने अजूनच छान लूक येईन.

2. झेंडूच्या फुलांची सजावट

बाप्पासाठी तुम्ही झेंडूची फुलांची आरास करु शकतात. झेंडूच्या पाकळ्यांनी बाप्पाच्या आसनाच्या बाजूला डिजाइन करु शकतात. त्याचबरोबर एका कार्डबोर्डवर झेंडूची अनेक फुले चिटकवून छान सजावट करु शकता. झेंडूच्या फुलांनी घरात छान सुवास दरवळेल आणि प्रसन्न वातावरण तयार होईल. त्याचबरोबर अनेक प्लॅस्टिक किंवा पेपरची झेंडूची फुले बाजारात उपलब्ध आहेत. या फुलांची सजावटही सुंदर दिसेल.

3. ओढणीच्या साहाय्याने सजावट

घरात तुम्ही ओढण्यांच्या साहाय्याने सजावट करु शकता. वेगवेगळ्या रंगाच्या ओढण्या एकमेकांना जोडून ते सजावट करण्यासाठी वापरु शकतो. तसेच ओढण्यांची वेणी घालून ते सजावटीच्या मागे लावू शकता.

4. दिव्यांची सजावट

तुम्ही तुमचे घर दिव्यांच्या साहाय्याने सजावट करु शकता. दिव्यांनी घराला वेगळाच लूक मिळेल. जर तुम्हाला खऱ्या दिव्यांनी सजावट करायची नसेल तर बाजारात अनेक इलेक्ट्रिक दिवे उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक दिव्यांच्या साहाय्याने बाप्पाच्या आसनाच्या बाजूला सजावट करु शकता.

Ganesh Chaturthi 2023
Mera Bill Mera Adhikar Yojana : सरकार देतेय करोडपती बनण्याची संधी! या लकी ड्रॉमध्ये कसे व्हाल सहभागी? वाचा सविस्तर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com