
लाडक्या बाप्पाचे लवकरच घरोघरी आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी कमी दिवस उरले आहे. यंदा १९ सप्टेंबरला बाप्पाचे विराजमान होणार आहेत. बाप्पाचा आवडीचा पदार्थ मोदक. मोदक हा गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे.
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषत: उकडीचे मोदक केले जातात. गणेशोत्सवादरम्यान घराघरातून उकडीच्या मोदकांचा सुगंध दरवळत असतो. मिठाईच्या दुकानांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे मोदक पाहायला मिळतात. अशातच जर तुम्ही देखील बाप्पासाठी मऊ उकडीचे मोदक बनवण्याचा बेत करत असाल तर या पद्धतीने बनवा कळ्या फुटणार नाही पाहा रेसिपी
1. मोदक बनवताना तांदूळ कोणता निवडावा?
सुवासिक बासमती रंग थोडा पिवळसर/ थोडे चिरतात
इंद्रायणी जुना (उत्तम)
आंबे मोहर उत्तम
कोलम व नवा तांदूळ (Rice) घेऊ नये.
2. पिठी साठी साहित्य | For making modak Flour -
आंबे मोहर तांदूळ १ किलो | Ambe Mohar Rice 1 Kilo
4. मोदकाची उकड | For making Modak Dough
तांदळाची पिठी २.५ कप | Rice Flour 2.5cup
पाणी २.५ कप | Water 2.5 cup
मीठ १ चमचा | Salt 1 tsp
तूप १ चमचा | Ghee 1 tsp
5. कृती
सर्वप्रथम कढई घेऊन त्यात चमचाभर तूप घाला नंतर त्यात नारळाचा किस आणि गूळ घालून चांगले परतवून घ्या.
गूळ वितळल्यानंतर त्याचा रंग बदलेल नंतर त्यात खसखस आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा. सारण थंड होण्यास ठेवा.
त्यानंतर आंबेमोहर तांदूळ धुवून सुकवून घ्या त्याची पिठी तयार करा. एका पातेल्यात अडीच कप पाणी घेऊन त्यात मीठ आणि चमचाभर तूप घाला.
पाणी उकळल्यानंतर मंद आचेवर तांदळाची पिठी घाला. पीठी चांगल्याप्रकारे ढवळून एकजीव करा. गॅस बंद करून झाकण १५ मिनिटे ठेवा.
तयार पीठ गरम असताना चांगल्याप्रकारे मळून घ्या. तयार पीठाच्या पाऱ्या बनवून त्यात मोदकाचे सारण भरा. कडा फुटणार नाही यापद्धतीने कळ्या पाडा.
तयार मोदकाची उकड काढा. केळीच्या पानात ठेवून वरुन तूपाची धार सोडा. तयार होतील २४ तास टिकतील असे उकडीचे मोदक
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.