Ganesh chaturthi 2023: मधुमेह आहे पण गणपतीत गोड मोदक खायचेत? 'या' टीप्स फॉलो करा आणि बिनधास्त गोड खा

Diabetes Ganpati Festival: गोड मोदक आणि लाडू पेढे खाण्यापासून स्वतःला थांबवणं कठीण आहे. मग अशावेळी काय करावे?
Ganesh chaturthi 2023
Ganesh chaturthi 2023Saam TV

Ganeshotsav 2023:

मधुमेह आजकाल फार सामान्य आजार झाला आहे. अगदी वयोवृध्द व्यक्ती तसेच लहान वयातील मुलांना देखील मधुमेह असल्याचं पाहायला मिळतं. अशात सध्या घरोघरी बाप्पा आलेत. त्यामध्ये गोड मोदक आणि लाडू पेढे खाण्यापासून स्वतःला थांबवणं कठीण आहे. मग अशावेळी काय करावे? (Latest Marathi News)

Ganesh chaturthi 2023
Makhana Benefits For Diabetics : शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी या ड्राय फ्रूटचा तुमच्या आहारात आजच समावेश करा

गोड पदार्थ खाण्याचा मोह सर्वांनाच होतो. हा मोह टाळून आरोग्याची काळजी घेणे महत्वाचं आहे. मात्र अनेक व्यक्ती आरोग्याची काळजी न घेता फक्त गोड खात सुटतात. त्यामुळे डायबिटीस आणखीन वाढतो कंट्रोलमध्ये राहत नाही. आता असे होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी याच्या काही टिप्स जाणून घेऊ.

1. सर्वात पहिला आणि रामबाण उपाय तर हाच आहे की, तुम्ही स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा. गोड खाण्याची इच्छा जास्त होत असेल तर आरती झाल्यावर तेथून दूर जा. प्रसाद अगदी कणभर खा. याने तुम्हाला पुढे होणारा त्रास रोखता येईल.

2. दुपारी किंवा रात्री जेवताना आपण प्रसादात गोड पदार्थ खातो. डायबिटीस असलेल्या व्यक्तींना असे करणे फार घातक ठरते. जेवताना आपल्या ताटात बरेच पदार्थ असतात. यातील काही पदार्थ फार तेलकट देखील असतात. असे पदार्थ खाल्याने शरीरातील कॅलरीज वाढते. त्यामुळे तुम्ही दुपारी जेवणाआधी 11 जवता आणि रात्री जेवणाआधी 7 वाजता गोड पदार्थ चाखवे.

3. आज गणपती बाप्पा घरोघरी आले आहेत. त्यामुळे नैवेद्याचे तिखट, तेलकट, चमचमीत पदार्थ खाताना काळजी घ्या. असे पदार्थ खाऊ नका. जर रक्तातील साखर जात प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच योग्य तो आहार निवडा.

4.डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी रात्रीच्यावेळी गोड खाणे पूर्णतः बंद करावे. रात्री मुळीच गोड खाऊ नये. कारण मेटाबॉलिझम सायंकाळ झाल्यानंतर मंदावते. त्यामुळे रात्री गोड खाणे घातक ठरेल. यामुळे शुगर जास्त प्रमाणात वाढू शकते.

5.जेवणाच्या आहाराच्या बाबतीत स्वतःची फसवणूक करू नका. मी आता थोडं गोड खातो आणि नंतर दोन दिवस काहीच गोड खाणार नाही असं करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य तो आहार घ्या.

Ganesh chaturthi 2023
Worst Foods for Heart : हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? आहारातल्या या पदार्थांना लगेच करा बाय बाय

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com