
१९ सप्टेंबरला गणपतीचे आगमन घरोघरी होणार आहे. महाराष्ट्रात गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १० दिवसांच्या उत्सवात गणपतीची विधीवत पूजा व अर्चना केली जाते.
सध्या सगळीकडे खरेदीची लगबग सुरु असेल. तसेच प्रसादात नैवेद्यात लाडू आणि मोदक दाखवला जातो. जर तुम्ही देखील बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देखील चविष्ट आणि टेस्टी काही बनवण्याचा विचार करत असाल तर रव्याचे मोदक ट्राय करुन पाहा.
1. साहित्य | Ingredients
बारीक रवा १ कप | Fine Semolina 1 cup
तूप ४ मोठे चमचे | Ghee 4 tbsp
मलाई/दूध १/४ कप | Fresh Cream/Milk ¼ cup
पिठी साखर १ कप | Sugar Powder 1 cup
वेलची पावडर १/४ चमचा | Cardamom Powder ¼ tsp
2. सारणासाठी | For Stuffing
काजू १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12
बदाम १० ते १२ | Almonds 10 to 12
पिस्ते १० ते १२ | Pistachios 10 to 12
गुळ बारीक चिरून २ मोठे चमचे | Fine Jaggery Powder 2 tbsp
वेलची पूड १/४ चमचा | Cardamom Powder ¼ tsp
नारळाचा किस २ मोठे चमचे | Desiccated Coconut 2 tbsp
केशर | Saffron
3. कृती
सर्वप्रथम कढई गरम करुन त्यात तूप घाला त्यानंतर रवा घालून खमंग भाजून घ्या.
त्यानंतर त्यात कपभर केसरचे दूध घाला आणि पुन्हा भाजून घ्या
भाजल्यानंतर त्यात पीठसाखर घालून परतवून घ्या वरुन वेलची पूड घालून ढवळत राहा.
मिश्रण शिऱ्यासारखे झाल्यानंतर वरुन ड्रायफ्रुट्स घाला आणि गॅस बंद करुन प्लेटमध्ये काढून घ्या.
तयार मिश्रण प्लेटमध्ये पसरवून थंड होण्यास ठेवा. मिक्सरमध्ये काजू, बदाम, पिस्ता, सुकलेल्या खोबऱ्याचा किस आणि गुळ घालून जाडसर वाटून घ्या
वाटलेल्या पावडरचे लहान छोटे गोळे तयार करा. थंड झालेल्या रव्याच्या सारणाला चांगले मळून घ्या.
मोदकाच्या सारणात तयार रव्याचे सारण भरुन पाकळी तयार करा, त्यात वरुन मिक्सरमध्ये वाटलेल सारण त्यात भरा.
तयार मोदक (Modak) केळीच्या पानात ठेवून बाप्पाला नैवेद्यात प्रसाद म्हणून ठेवा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.