Iron Deficiency : नॉन व्हेजपेक्षा अधिक फायदेशीर आहे स्वयंपाकघरातील हा पदार्थ, लोहाच्या कमतरेपासून होईल सुटका

Garam Masala Powder Remove Iron Deficiency : शरीरात लोहाची कमतरता झाल्यास आपल्या त्वचेवर, केसांवर व नखांवर याची लक्षणे दिसू लागतात.
Iron Deficiency
Iron DeficiencySaam Tv

Garam Masala Benefits : शरीरात लोहाची कमतरता झाल्यास आपल्या त्वचेवर, केसांवर व नखांवर याची लक्षणे दिसू लागतात. यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी डॉक्टर आहारात लोह वाढवण्याचा सल्ला देतात.

अनेकजण लोह वाढवण्यासाठी नॉन व्हेजचा आधार घेतात पण, स्वयंपाकघरातील या पदार्थामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवता येते. मांस-मच्छीत अनेक प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

Iron Deficiency
Iron Rich Foods : सतत अशक्तपणा येतो ? 'हे' पदार्थ खा, रक्ताची कमी होईल मिनिटांत दूर !

जी शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवतात. यात अनेक अशी पोषक तत्त्वे असतात जी अनेकदा शाकाहारी अन्नात कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्यात शाकाहारी लोकांसाठी हा मांस-मच्छीचा पर्याय निरुपयोगी ठरतो. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असणारा गरम मसाला शरीरातील लोह वाढवण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.

आपल्या स्वयंपाकघरात (Kitchen) आपण रोजच्या आहारात हमखास वापरतो तो पदार्थ म्हणजे मसाला. मसाला आपल्या भारतीय पदार्थांतील महत्त्वाचा पदार्थ आहे. आपल्याकडे मसाल्यांचे अनेक प्रकार आहेत, त्या प्रकारांबरोबर जशी त्यांची चव बदलते तसेच त्यांचे गुणधर्म देखील बदलतात.

Iron Deficiency
Protein Deficiency : 'ही' लक्षणे जाणवत असल्यास वेळीच व्हा सावध ! असू शकते प्रोटीनची कमतरता

आपण आपल्या जेवणात वापरत असलेल्या गरम मसाल्यातही अनेक पोषक तत्त्वे असतात. याच्या थोड्याश्या प्रमाणातही अनेक आजार दूर करण्याची क्षमता असते. तसेच लोहाच्या प्रमाणातही इतर पदार्थांपेक्षा गरम मसाला (Masala) अधिक गुणकारी आहे. कारण गरम मसाला बनवण्यासाठी विविध प्रकारच्या लोहयुक्त मसाल्यांचा वापर केला जातो. जाणून घेऊया त्याबद्दल

गरम मसाल्याचे फायदे आणि तोटे

1. लोहाचा उत्तम स्त्रोत

आहारतज्ज्ञांच्या मते गरम मसाल्यात वेलची, धणे, जिरे, काळी मिर्ची इत्यादींचा समावेश असतो जे लोहाचे चांगले स्त्रोत आहेत. जवळजवळ 100 ग्रॅम धणे पावडरीत 17 मिली, तेवढेच जिऱ्यात 20 मिली जायफळ 20 मिली लोह असते.

2. गरम मसाला घरी कसा बनवावा

  • 100 ग्रॅम जिरे

  • 75 ग्रॅम काळी मिर्ची

  • 75 ग्रॅम मोठी वेलची

  • 10 ग्रॅम लहान वेलची

  • 10 ग्रॅम लवंग

  • 10 ग्रॅम दालचीनी

  • 5 ग्रॅम लांब मिरपूड

  • 5 ग्रॅम जायफळ

Iron Deficiency
Calcium Deficiency : कॅल्शियमची कमतरता जाणवतेय? 'या' डेअरी प्रॉडक्टचे करा सेवन

3. गरम मसाला वापरताना या चुका करु नका

आहारतज्ज्ञांच्या मते, गरम मसाल्याचे अनेक फायदे (Benefits) असले तरी त्याचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यास पित्ताचा त्रास, शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढणे, अपचनासारखे त्रास होऊ शकतो.

Iron Deficiency
Priya Bapat : प्रियाच्या दिलखुलास स्माइलवर गुलाबाची कळीही लाजली...

4. या आजारांवर आहे गुणकारी

1. अशक्तपणा

2. अपचन

3. जास्त वजन

4. कमकुवत प्रतिकारशक्ती

5. हृदयरोग

6. कॉलेस्ट्रॉल

7. मधुमेह

8. संधिवात

9. मासिक पाळी आधीची पोटदुखी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com