डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे या नैसर्गिक गोष्टींनी घालवा

कामाच्या व्यापामुळे किंवा सतत जागरणामुळे आपले डोळे दुखू लागतात.
Get rid of dark circles naturally with these ingredients, Eye care tips
Get rid of dark circles naturally with these ingredients, Eye care tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या सौंदर्यांतील महत्त्वाचा भाग अर्थात डोळे आहे. डोळ्यांमुळे आपल्याला निसर्गाच नटलेल रुप पाहता येते. डोळ्यांमुळे बऱ्याचदा आपल्या मनातील भावना ओळखता येतात.

हे देखील पहा -

कामाच्या व्यापामुळे किंवा सतत जागरणामुळे आपले डोळे (Eye) दुखू लागतात. त्यामुळे डोळ्यांखाली काळे वर्तुळ दिसू लागते. तणाव, हार्मोनल बदलांपासून विस्कळीत जीवनशैलीपर्यंत अशी अनेक कारणे असू शकतात. आपल्यापैकी बरेच जण डोळ्यांखाली असणारी काळे वर्तुळे लपवण्यासाठी अनेक केमिकलने भरलेली उत्पादने किंवा क्रीमचा वापर करतो. काळ्या वर्तुळापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करु शकतो.

या पदार्थांचा वापर करा -

१. डोळ्यांखाली असणारी काळे वर्तुळ घालवण्यासाठी कोरफड प्रभावी ठरु शकते. कोरफड त्वचेचे पोषण करण्यास मदत करते व अकाली वृद्धत्व टाळते. कोरफड जेलचा वापर करताना हलक्या हाताने डोळ्यांखाली मसाज करा व नंतर पाण्याने स्वच्छ धुवा असे नियमित केल्याने फायदा होईल.

Get rid of dark circles naturally with these ingredients, Eye care tips
इअरफोनचा अतिवापर आरोग्यास ठरेल घातक !

२. गुलाबपाणी हे चेहऱ्याच्या प्रत्येक भागावर उपयुक्त ठरते. गुलाबपाणी हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कापसाच्या बोळ्यात गुलाबपाणी घेऊन ते डोळ्यांना नियमित लावावे.

३. टोमॅटो हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहेत. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे डोळ्याच्या आसपासच्या भागाचा रंग कमी करण्यास मदत करतात. टोमॅटोचे काप डोळ्यांवर ठेवा किंवा टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस डोळ्यांखाली लावावा व थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावे.

४. बटाट व काकडीत व्हिटॅमिन्स (Vitamins), अँटिऑक्सिडंट्स दाहक-विरोधी असणारे गुणधर्म आहेत. कच्चे बटाटे किंवा काकडी किसून किंवा त्याचे काप डोळ्यांवर ठेवा. असे रोज केल्याने डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे कमी होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com