
मुंबई : घराची (Home) स्वच्छता ही सणासुदीच्या आधी, तीन किंवा सहा महिन्यातून एकदा होत असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. परंतु, आपण घर कितीही स्वच्छ केले तरी काही वेळानंतर पुन्हा धूळ दिसू लागते. काहींना धुळीचा त्रास असल्यामुळे वारंवार साफसफाई केल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. परंतु, धूळ साफ न केल्यास घरात ठेवलेले फर्निचर आणि वस्तूही खराब होऊ शकतात. घरामध्ये धूळ येऊ नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या आणि घरातील वस्तूंची सोप्या उपायांनी स्वच्छता (Clean) केली तर घरात धूळ पसरणार नाही तसेच घराची स्वच्छताही चांगली होईल. घराची स्वच्छता कशी राखायची व अवघड ठिकाणे सहज स्वच्छता कशी करता येईल आणि घराला धूळमुक्त करू शकता यासाठी काही टिप्स (Tips) सांगणार आहोत. (Home Cleaning Tips in Marathi)
हे देखील पहा -
घराला धूळमुक्त ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
१. घरातील साफसफाईचे सर्वात कठीण जागांपैकी एक म्हणजे सीलिंग फॅनच्या ब्लेडवर साचलेली धूळ आणि घाण साफ करणे. याची स्वच्छता राखण्यासाठी आपण जुन्या उशीचे कव्हर घेऊन त्यात सीलिंग फॅनचे ब्लेड टाका आणि ते घासून पुसा. त्यामुळे उशीच्या आवरणात धूळ -घाण पडून पलंग व फरशी स्वच्छ राहतील आणि इतर ठिकाणी घाण पसरणार नाही.
२.घरी किंवा ऑफिसमधे काम करताना आपण बऱ्याचदा तिथेच बसून खातो अशावेळी आपल्या लॅपटॉपच्या कीबोर्डवर धुळीचे कण जमा होतात आणि ते स्वच्छ करण्याचा कोणताही मार्ग आपल्याला सापडत नाही. अशावेळी लॅपटॉप कीबोर्ड किंवा इतर गॅजेट्स स्वच्छ करण्यासाठी आपण बेबी वाइप्सचा वापर करू शकतो. तसेच ब्लो बॉलच्या मदतीने देखील साफ करू येऊ शकते.
३. टीव्ही स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी सामान्य कापडाऐवजी मायक्रो फॅब्रिक टॉवेलचा आपण वापर करु शकतो. तसेच आपण स्क्रीन सॉफ्टनरमध्ये भिजवूनही स्वच्छ करू शकतो.
४. काचेचे टेबल, दरवाजे, खिडक्या आणि आरसे साफ करायचे असल्यास एका भांड्यांत फॅब्रिक सॉफ्टनर पाण्यात मिसळा. त्यानंतर या पाण्यात साफ करणारे कापड बुडवा आणि साफसफाई सुरू करा. तसेच ते कोरड्या कापडाने घासून घ्या.
५. घरातील झूमर दिवे अधिक नाजूक असल्यामुळे त्याची स्वच्छता राखणे कठीण असते. परंतु, ते साफ करण्यापूर्वी प्लग बंद करा किंवा काढा. त्यानंतर फॅब्रिकचे हातमोजे घालून आणि पाण्यात मायक्रोफायबर टॉवेल भिजवून हळूहळू स्वच्छ करा.
६. खिडकी आणि दाराच्या जाळीवर वारंवार धूळ साचत असेल तर त्यासाठी स्टीलच्या ब्रशच्या मदतीने खिडकी आणि दाराच्या जाळी घासून घ्या. असे केल्याने जाळीतून धूळ निघून जाईल. त्यानंतर पाण्याने धुवा.
अशाप्रकारे तुम्ही घराची स्वच्छता राखू शकता.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.