ऑफिस वेअरसाठी मुलींनी आपल्या कपाटात या कपड्यांचा समावेश करा

घरात पार्टीला, लग्नसमारंभात किंवा ऑफिसला जाताना आपले कपडे ठरलेले असतात.
Fashion tips, office wear clothes
Fashion tips, office wear clothes ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रत्येकांची शरीरयष्टी ही वेगवेगळी असते. अशावेळी आपण आपल्याला साजेसे कपडे घालतो. घरात पार्टीला (Party), लग्नसमारंभात किंवा ऑफिसला जाताना आपले कपडे ठरलेले असतात.

हे देखील पहा -

ऑफिसला (Office) जाताना आपल्यापैकी बरेच जण कपड्यांच्या बाबतीत गोंधळलेले असतात. ज्यामुळे आपण ऑफिसला जाताना नीटनीटके दिसत नाही यासाठी आपण तासनतास वाया घालवतो. विशेषत: सडपातळ मुलींनी कोणतेही कपडे घातल्यास त्यांना ते अधिक सैल दिसू लागतात. अशावेळी ऑफिस वेअरसाठी कपडे निवडताना काय काळजी घ्याल हे जाणून घेऊया.

ऑफिस वेअरसाठी या टिप्स फॉलो करा -

१. आपले वजन वाढले असल्यास आपण स्कीनी जीन्स किंवा स्कीनी पॅन्ट घालणे टाळायला हवे. त्याऐवजी डार्क टी-शर्ट व डार्क पॅन्ट वापरायला हवी. तसेच लाइट डेनिम, व्हाईट कलर व इतर लाइट शेडची पॅन्टही ट्राय करू शकतो. टाईट पॅन्टऐवजी आपण पलाझो पॅन्ट कॅरी करू शकतो व त्यांना क्रॉप टी-शर्टसह घालू शकतो.

Fashion tips, office wear clothes
वन पीसवर हे फूटवेअर ट्राय करा

२. बर्‍याचदा सैल कपडे सडपातळ मुलींना चांगले दिसत नाहीत. म्हणूनच सैल कपडे घालताना आपण लूज टॉप किंवा टी-शर्ट नेहमी टक-इन करायला हवा ज्यामुळे आपला लूक चेंज होईल.

३. जर आपले हात अधिक सडपातळ असतील तर आपण टॉप्सच्या स्लीव्ह्जची काळजी घ्यायला हवी. अशावेळी आपण क्वार्टर किंवा फुल लेन्थ स्लीव्हज असलेले टॉप निवडावेत. याशिवाय फ्लेर्ड स्लीव्हज, बेल स्लीव्हज आणि लूज स्लीव्हजसह टॉप्स सोबत आपण स्टाइल करू शकतो.

४. ऑफिसमध्ये फॉर्मल लूकवर बोल्ड प्रिंट टॉप्स घालू नका. पण आपल्या कपाटात साधा प्रिंटेड टॉप असायला हवा. ज्यामुळे आपण चांगले दिसू शकतो. बाजारात विविध प्रकारचे साधे प्रिंटेड आणि पॅटर्न केलेले टॉप उपलब्ध मिळतात. त्यामुळे कॅज्युअल आउटफिट्स आपण स्टाईल करू शकतो.

५. शॉर्ट कुर्त्या ह्या सडपातळ मुलींवर अधिक सुंदर दिसतात. त्यावर आपण बॅगी जीन्स किंवा पलाझो पँटसोबत कॅरी करू शकतो. अशावेळी ऑफिस वेअरसाठी आपण वेगवेगळ्या प्रिंट्सच्या शॉर्ट कुर्त्यांचा समावेश करू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com