बिघडलेल्या नात्याला द्या अशाप्रकारे एक नवीन संधी

आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात तसेच आपल्या नात्यात देखील असते.
How to improve your relationship
How to improve your relationshipब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात तसेच आपल्या नात्यात देखील असते. एकत्र राहून सुध्दा बऱ्याचदा आपल्यात भांडणे होतात त्यामुळे आपली सतत चिडचिड होते.

हे देखील पहा -

ही भांडण सामान्य जरी असली तरी आपल्या नात्यात (Relation) यांचा किती प्रभाव पडतो हे आपल्याला माहीत असते. पण ही भांडण अगदी टोकापर्यंत घेऊन जाऊ नये. आपण कधी कधी आपल्या नात्याबद्दल इतके चिंताग्रस्त असतो की, आपली सतत चिडचिड होऊ लागते. कामातून इतके थकलेले असतो किंवा काही कारणामुळे आपण दुखी असतो तेव्हा खरेतर आपल्याला आपल्या जोडीदाराचा सहवास हवा असतो. परंतु, अशावेळी आपले संभाषण फार कमी होत असते. ज्यावेळी बोलणे सुरु होते त्यावेळी सतत एकमेकांबद्दल तक्ररारी असतात अशावेळी आपण आपल्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने घट्ट विणण्याची गरज असते त्यावेळी काय कराल हे जाणून घ्या

छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नात्यात मोठी सुधारणा होईल

⦁सर्वप्रथम आपण कोणत्याही नात्याला त्याचा योग्य तो वेळ (Time) द्यायला हवा. त्यामुळे आपल्याला आपल्या नात्याची योग्य पातळी कळते.

⦁रात्रीच्या जेवणात काय बनवायचे हे दोघांना मिळून ठरवा त्यासाठी प्लॅन बनवा.

How to improve your relationship
रात्रीच्या वेळी भूक लागत असेल तर, हे पदार्थ खा मिळेल पोषण तत्व

⦁जेव्हा आपल्याला एकमेकांसाठी वेळ मिळेल त्यावेळी आपल्याला नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून घ्या.

⦁आपले येणाऱ्या आठवड्याचे काम अधिक असेल तर आपण आपल्या पार्टनरला त्याविषयी कल्पना द्याला विसरु नका.

⦁आपली कामे वाटून घ्या. एकाने कपडे धुतल्यानंतर दुसऱ्याने त्याला सुकवण्याचे काम करा.

⦁घरातील कामे कराताना आपल्या मुलांना देखील पुरेसा वेळ द्या.

⦁आपल्याकडे वेळीची कमतरता असेल तर आपण घरात काम करण्यासाठी कोणाला कामावर ठेवा त्यामुळे आपल्या नात्याला वेळ मिळेल.

⦁पैशांवरुन आपल्यात बरेच वाद होतात. अशावेळी आपण कोणाची तरी मदत घ्या. आपल्या जोडीदारासोबत यांवर चर्चा करुन मार्ग काढा.

⦁एकमेकांशी बोलून आपल्या मनातील गोष्टी सांगा त्यामुळे आपल्या मनात नेमके काय सुरु आहे हे आपल्या जोडीदाराला कळेल.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com