
Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नवेनवे प्रयोग करत असतो. उन्हाच्या किरणांमुळे त्वचा अधिक रुक्ष तर होतेच पण काळी देखील पडते. अशातच आपण चेहऱ्याला अधिक उजळवण्यासाठी महागड्या उत्पादनाचा वापर करतो.
पाहायला गेले तर ब्युटी (Beauty) टिप्ससाठी सोशल मीडियावर रोज नवे काहीतरी व्हायरल होत असते. त्यात कोरियन स्टाईल ब्युटी ही अधिकच फेमस होत आहे. बाजारात कोरियन स्टाईलचे ब्युटी प्रोडक्ट सहज मिळतात पण त्याची महागडी किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नसते. अशातच आज आम्ही तुम्हाला तुमचा चेहरा (Face) ग्लो करण्यासाठी स्वयंपकाघरातील पदार्थांचा वापर करुन तो अधिक सुंदर कसा दिसू शकतो हे सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल
1. साहित्य
तांदळाचे पीठ
कोरफड (Alovera) जेल
2. तांदळाच्या पीठाचे फायदे
तांदळाच्या पीठा त्वचेला व्हाइटनिंग करण्याचे गुणधर्म असतात.
तसेत तांदळाचे पीठ मृत व खराब झालेल्या त्वचेला काढण्यास मदत करतो.
त्वचेला अधिक चांगली करण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर आहे.
3. कोरफड जेल
कोरफडमध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट्स हे त्वचेला पोषण देण्यास अधिक मदत करतात.
त्वचेचा कोरडपणा कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करेला जातो.
4. कसा कराल वापर ?
त्वचेवर ग्लो मिळविण्यासाठी एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या.
यामध्ये तुम्ही कोरफडीचे जेल पीठात मिसळा.
चेहऱ्यावर लावण्यासाठी तुम्ही ब्रशचा वाप करु शकता.
किमान 15 मिनिटांनंतर पाणी आणि कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.
यानंतर आपण बर्फाच्या मदतीने चेहरा साफ करू शकता.
तसेच, तुम्ही स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता.
हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा चेहऱ्यावर वापरू शकता.
या फेस पॅकचा सतत वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.