फिरायला जाताय तर, या गोष्टींपासून रहा सावधान..!

टिकीट बुक करताना अशी घ्या काळजी.
Travelling tips in marathi
Travelling tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबंई - आपला प्रवास (Travel) सुरळीत आणि समस्यामुक्त व्हावा अशी प्रत्येक प्रवाशाची इच्छा असते. त्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. प्रवास सुखकर करण्यासाठी आगाऊ नियोजन करणे आणि प्रत्येक गोष्टीचे आगाऊ बुकिंग (Booking) करणे आवश्यक मानले जाते. परंतु या प्री-बुकिंग प्रकरणामध्ये अनेक वेळा आपण अशा फसवणुकीत अडकले जातो की पैसे तर बुडतातच, पण प्रवासही कठीण होऊन जातो. वास्तविक बघायला गेले तर कमी अनुभव हे याचे कारण असू शकते. एवढेच नाही तर विक्री किंवा कोणत्याही ऑफरच्या फसवणुकीचे बळी आपण ठरले जातो. (Travelling tips)

हे देखील पहा-

प्रवासात कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही अगोदरच काळजी घेतली पाहिजे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या तर अशा समस्या टाळता येतील. असे घोटाळे आणि फसवणूक टाळण्यासाठी प्रवासापूर्वी व प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१. टूर पॅकेजचा घोटाळा -

प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून लोकांना टूर (Tour) पॅकेज बुक करायला आवडते. पण टूर पॅकेज निवडताना तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. टूर पॅकेज बुक करताना, एजन्सीशी संबंधित सर्व माहिती आधी घ्या आणि अधिक ऑफर्सच्या लालसेत पडू नका.

Travelling tips in marathi
Cleaning Tips : अशी राखा तुमच्या घरातल्या कुलरची स्वच्छता..!

२. खाजगी बस फसवणूक -

टूर पॅकेजनंतर, खाजगी बसेसशी संबंधित फसवणूक सर्वात सामान्य आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण प्रवास खराब होऊ शकतो. अशा बसेस लोकांच्या प्री-बुकिंग केलेल्या जागा विकून प्रवाशांना वाटेत कुठेतरी सोडतात व अधिक पैसे कमावतात. त्यामुळे तुम्ही सरकारी बस किंवा ट्रेनचा प्रवास निवडलात तर बरे होईल.

३. टॅक्सी घोटाळा -

अनेक वेळा लोक टॅक्सी घोटाळ्यांनाही बळी पडले जातात. स्थानिक टॅक्सीवाले अनेक लोकांकडून जास्त पैसे उकळतात. इतकेच नाही तर अनेक ड्रायव्हर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी घेऊन जातात जिथे त्यांनी आधीच डील केलेली असते. तसेच काही टॅक्सीवाले लांबचा रस्ता निवडून तुमच्याकडून अधिक पैसे उकळतात. त्यामुळे तुम्ही टॅक्सीची निवड करत असाल तर आधी त्या जागेबद्दल सर्व माहिती स्वत: गोळा करा आणि तुम्हाला कुठे जायचे आहे ते ठरवा.

४. फ्रेंडली लोकल्‍स -

प्रवासादरम्यान, अनेक वेळा स्थानिक लोक तुमच्याशी जवळीक साधून किंवा तुमची मदत करून पैसे उकळू लागतात. अशावेळी तुम्ही सावधानता बाळगा. तुमचे कोणतेही सामान त्यांच्या जवळ ठेवू नका जेणेकरुन तुमचे सामान लुटले जाईल व तुम्हाला त्याचा त्रास होईल. तसेच जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल किंवा जबरदस्ती करत असेल तर पोलिसांची मदत घ्या.

बुकिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या आणि प्रवासाचा आनंद लुटा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com