Gold Astrology: 'या' ४ राशीच्या व्यक्तींसाठी सोन्याचे दागिने घातक; वाचा तुमची रास यात आहे का?

Gold Negative Effects: ज्योतिषशास्त्रानुसार त्या राशींच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींमुळे व्यक्ती तणावात जातात.
Gold Astrology
Gold AstrologySaam TV

Gold Astrology:

सोन्याचे दागिने कुणाला आवडत नाही? प्रत्येकच व्यक्तीला सोन्याचे दागिने फार आवडतात. सोनं हा सर्वात महागडा धातू आहे. त्याचे दागिने बनवून घातल्यास व्यक्ती आणखीन आकर्षक दिसते असं म्हणतात. (Latest Marathi News)

Gold Astrology
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

सोन्याच्या (Gold) दागिन्यांकडे महिला जास्तीत जास्त आकर्षित होतात. अनेक जण सोन्याच्या दागिन्यांवर पैसे गुंतवतात. मात्र तुम्हाला माहितीये का? सोन्याचे दागिने काही ठराविक रशींसाठी घातक आहेत. सोन्याचे दागिने घातल्याने या राशींच्या जीवनात गुंतागुंत आणि त्रास वाढतो. गोष्टी मनासारख्या होत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार त्या राशींच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींमुळे व्यक्ती तणावात जातात. त्यामुळे आज या बातमीमधून त्या राशी कोणत्या आहेत याची माहिती जाणून घेऊ.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव फार शांत असतो. या व्यक्तींच्या आयुष्यात सर्व काही छान सुरू असताना त्यांनी सोन्याचा दागिना घातल्यास गोष्टी बिघडू शकतात असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे. त्यानुसार वृषभ राशीसाठी सोनं अशुभ आहे.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्ती आपल्या कामाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या असतात. यांच्यासाठी देखील सोनं शुभ मानलं जात नाही. या राशीच्या व्यक्तींनी सोन्याचे दागिने घातल्यावर त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचण्याची शक्यता असते.

मिथुन

बृहस्पति ग्रहाच्या स्थितीवर मिथुन राशीच्या व्यक्तींनी सोन्याचे दागिने परिधान करायचे की नाही हे ठरवावे. जर बृहस्पतिची स्थिती वाईट असेल तर सोन्याचे दागिने परिधान करू नये. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनी देखील सोन्याचे अलंकार शक्यतो टाळावेत. कारण दागिने परिधान केल्याने या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक वादळे आणि संकटे येतात. तसेच मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.

सोन्याचे दागिने घालायचे असतील तर फक्त हौस म्हणून नाही तर तुमची रास ज्योतिषांना दाखवून दागिने परिधान करायचे की नाही हे ठरवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Gold Astrology
Gold Silver Rate (14th September): सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या वाढत्या दराला ब्रेक, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com