Gold Silver Price: सोन्याच्या दरात मोठी झेप, चांदी पुन्हा ५७ हजारांच्या पुढे, पाहा आजचा भाव

भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.
Gold Silver Rate, Gold Rate Today, Gold Price updates, Today's Gold Rate, Silver Rate Today, Today's Silver Rate, How to Check Gold Purity
Gold Silver Rate, Gold Rate Today, Gold Price updates, Today's Gold Rate, Silver Rate Today, Today's Silver Rate, How to Check Gold PuritySaam TV

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे. भारतीय सराफा बाजारात सोने (Gold Price) कधी महाग तर कधी स्वस्त होत आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी सकाळी पुन्हा सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील वाढत्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आणि आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.

MCX वर सोन्याचा वायदे भाव 170 रुपयांनी वाढून 50,670 वर पोहचला आहे. सोन्याबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्याच्या किंमतीत उसळी दिसू लागली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोने 0.34 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोने-चांदी आणखी महाग होण्याची शक्यता आहे. (Today's Gold Rate)

हे देखील पाहा -

चांदीच्या दरात वाढ

सोन्याप्रमाणे आज चांदीच्या दारातही वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी एमसीएक्सवर चांदीचा भाव 327 रुपयांनी वाढून 57,053 रुपये प्रति किलो झाला. मागणी वाढल्यानंतर लगेचच चांदीच्या दरात 0.58 टक्क्यांनी वाढ झाली. जगभरातील देशांमध्ये औद्योगिक उपक्रम सामान्य होत असल्याने येत्या काळात चांदीच्या मागणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. (Silver Rate Today)

Gold Silver Rate, Gold Rate Today, Gold Price updates, Today's Gold Rate, Silver Rate Today, Today's Silver Rate, How to Check Gold Purity
मुंबईकरांसाठी बातमी! भिंत कोसळल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावर २ तासांचा Emergency ब्लॉक

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. (How To Check Gold Purity In India)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com