Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, चांदीला आली चमक; पाहा आजचा भाव

सोने घसरले असले तरी, चांदीच्या दरात (Silver Price) मात्र चमक दिसून आली.
Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Gold-Silver Price Today, Gold Silver rate Saam Tv

नवी दिल्ली : जागतिक बाजारात पिवळ्या धातूच्या किंमतीत वाढ होऊनही गुरुवारी सकाळी सोन्याच्या (Gold Price) दरात घसरण दिसून आली. सोने घसरले असले तरी, चांदीच्या दरात (Silver Price) मात्र चमक दिसून आली. वायदे बाजारात चांदीचा भाव सध्या 59 हजारांच्या आसपास आहे, तर सोन्याचा भाव 50,500 च्या वर कायम आहे. (Gold Silver Latest Price Today)

Gold-Silver Price Today, Gold Silver rate
महागाईची झळ आणखी तीव्र! आता तुमचं खाणं पिणं महागणार; १८ जुलैपासून GST दरात वाढ

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव (Gold Silver) सकाळी 38 रुपयांनी घसरून 50,691 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरूवारी बाजार उघडताच सोन्याचा भाव 50,740 इतका होता. मात्र, मागणी कमी झाल्याने सोन्याच्या भावात घसरण झाली. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याचा भाव सुमारे 0.07 टक्क्यांनी घसरला आहे.

चांदी दरात झाली वाढ

बुधवारी चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. मात्र गुरूवारी बाजार उघडताच चांदीच्या दरात वाढ झाली. चांदीचा भाव 76 रुपयांनी वाढून 59,137 रुपये प्रति किलो झाला आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार सकाळी 59,200 रुपयांवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणी कमी झाल्याने त्यात थोडी घसरण झाली. (Gold-Silver Price Hike Today)

Gold-Silver Price Today, Gold Silver rate
कोरोनाची चौथी लाट आली? देशातील 24 तासांतील आकडेवारी उरात धडकी भरवणारी

जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट

जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरातही चढ-उतार होत आहे. यूएस मार्केटमध्ये, सोन्याची स्पॉट किंमत $ 1,816.30 प्रति औंस आहे, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.07 टक्क्यांनी कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील $ 20.71 वर आहे, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.05 टक्के कमी आहे. याचा अर्थ आज जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंची मागणी कमी होती. (Gold-Silver Rate Today)

आगामी काळात सोन्या-चांदीचा भाव कसा राहिल?

रशियाच्या सोन्याच्या आयातीवर काही प्रमुख देशांनी निर्बंध लादल्यानंतर जागतिक बाजारपेठेतील त्याच्या पुरवठ्यावर काही काळ परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशिया हा सोन्याचा प्रमुख निर्यातदार असून तिथून होणारी आवक बंद झाल्याने भारतासह जगभरातील बाजारपेठांवर परिणाम होणार आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीचे भाव पुढील काही काळ तेजीत राहू शकतात.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com