Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीही वधारली, जाणून घ्या आजचा भाव

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही उसळी पाहायला मिळत आहे.
Gold Silver Price Updates
Gold Silver Price UpdatesSaam tv

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज सोन्यावरील आयात शुल्कात ५ टक्क्यांनी वाढ केल्याने सोन्याच्या (Gold Price) किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वायदे बाजारात सोन्याचा भाव पुन्हा 52 हजारांच्या जवळ गेला आहे. आज सकाळीच (Silver Price) सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची उसळी दिसून आली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत आज सकाळी 1,103 रुपयांनी वाढून प्रतितोळा 51,620 रुपयांवर पोहोचली. (Gold Silver Latest Price Today)

Gold Silver Price Updates
Keto diet : किटो डाएट म्हणजे काय ? ते कोणत्या व्यक्तींनी करु नये?

गेल्या 2 महिन्यातला हा सोन्याचा उच्चांक आहे. सोन्याचा भाव मागील बंद किमतीच्या तुलनेत 2.18 टक्क्यांनी वधारला आहे. सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 7.5% वरून 12.5% ​​केले आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोने आयातदार देश आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा काही काळापासून मंदी असलेल्या सोन्याच्या किरकोळ किमतीवरही परिणाम होणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळात सरकारने आयात शुल्कात केवळ ५ टक्के कपात केली होती.

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही उसळी पाहायला मिळत आहे. MCX वर, चांदीची फ्युचर्स किंमत 370 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी चांदीचा व्यवहार 58,418 रुपयांवर सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने काही वेळातच त्यात तेजी दिसून आली. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.63 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे. (Gold-Silver Price Hike Today)

Gold Silver Price Updates
Hair Fall: शरीरात जीवनसत्त्वांची कमी झाल्यानंतर होऊ शकते केसगळतीची समस्या

जागतिक बाजारपेठेत मोठी घसरण

देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होत असतानाच आज जागतिक बाजारात दोन्ही मौल्यवान धातू स्वस्त झाले आहेत. यूएस मार्केटमध्ये, आज सकाळी सोन्याची स्पॉट किंमत $1,802.63 प्रति औंस होती, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.23 टक्क्यांनी कमी होती, तर चांदीची स्पॉट किंमत $20.1 होती, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.80 टक्के स्वस्त आहे.

सोनं आणखी महागणार?

सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे किरकोळ बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीतही वाढ होईल आणि त्यात मोठी उसळी येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती अजूनही कमी असल्या तरी रशियावर जी 7 देशांच्या निर्बंधांचा प्रभाव पडल्यानंतर त्याच्या किंमती वाढतील, ज्याचा भारतीय बाजारावरही स्पष्ट परिणाम दिसून येईल. एकूणच सोन्याचे भाव वाढण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com