एअरटेलने यूजर्सना दिली खूशखबर! ‘या’ प्लॅनमध्ये Netflix पूर्णपणे मोफत

जगभरात Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मला सर्वात जास्त प्रमाणात प्रेक्षकवर्ग आहे.
एअरटेलने यूजर्सना दिली खूशखबर! ‘या’ प्लॅनमध्ये Netflix पूर्णपणे मोफत
Airtel and Netflix Saam Tv

वृत्तसंस्था: जगभरात Netflix या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मला सर्वात जास्त प्रमाणात प्रेक्षकवर्ग (Audience) आहे. यावर आपला आवडता कंटेंट स्ट्रीम करण्याकरिता युजर्संना सबस्क्रिप्शन घ्यावे लागत आहे. यासाठी नेटफ्लिक्सकडून मासिक आणि वार्षिक सबस्क्रिप्शन ऑफर करण्यात येत असते. नेटफ्लिक्सची मेंबरशिप (Netflix membership) घेण्याकरिता तुम्ही नेटफ्लिक्सच्या वेबसाइटवर अधिकची माहिती घेऊ शकणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला यूपीआय, डेबिट/ क्रेडिट कार्ड, पेटीएम आणि अन्य माध्यमातून पेमेंटचे (payment) पर्याय दिसतील.

मात्र, जर तुम्हाला नेटफ्लिक्सचे प्लॅन मोफत किंवा ऑफरमध्ये बघितलं असतील तर, काही टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) ही सुविधा देत आहेत. एअरटेलने अगोदरच त्यांच्या काही प्रीपेड आणि पोस्टपेड (Postpaid) स्कीमबरोबर नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन विनामूल्य ऑफर करते. आता, दूरसंचार ऑपरेटरने निवडक ब्रॉडबँड योजनाबरोबरच विनामूल्य नेटफ्लिक्स सदस्यता ऑफर करण्याची घोषणा केली आहे. एअरटेल (Airtel) प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅन आता मोफत नेटफ्लिक्सबरोरबच येतात.

हे देखील पाहा-

एअरटेल प्रोफेशनल प्लॅनची किंमत १४९८ रुपये प्रतिमहिना आहे तर इन्फिनिटी प्लॅनची किंमत ३९९९ रुपये प्रतिमहिना आहे. एअरटेल प्रोफेशनल प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्संना नेटफ्लिक्सच्या १९९ रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्ये मंथली एन्ट्री मिळणार आहे. Airtel Infinity प्लॅनची निवड करत असताना त्यांना नेटफ्लिक्सच्या ६४९ च्या प्रीमियम प्लॅन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नेटफ्लिक्स देशात मोबाइल प्लॅन, बेसिक प्लॅन, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन याबरोबरच ४ प्लॅन ऑफर करत आहे. मोबाईल प्लॅन १४९ रुपये प्रतिमहिना १ स्क्रीन सपोर्टसह येतो. जो मूळ १९९ रुपयांच्या प्लॅनसाठी आहे. २ आणि ४ स्क्रीनकरिता सपोर्टसह ४९९ रुपयांचा स्टँडर्ड प्लॅन आणि ६४९ रुपयांचा प्रीमियम प्लॅन मिळतो. नेटफ्लिक्सच्या या तिन्ही प्लानमध्ये फोन, टॅबलेट, कॉम्प्यूटर आणि टीव्हीसह ४ डिव्हाइसचा सपोर्ट मिळत आहे.

Airtel and Netflix
नेपाळच्या प्रसिद्ध नाईटक्लबमध्ये दिसले राहुल गांधी? व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

हे फॉलो करा

-एअरटेल थँक्स अॅपवरील ‘Discover Thanks Benefits पेजवर जाणे

-खाली स्क्रोल करा आणि ‘Enjoy Your Rewards’ मध्ये ‘नेटफ्लिक्स’ वर क्लीक करणे.

-‘Claim’ वर क्लीक करणे.

- Netflix वरील पेजवर ‘ Procedure पर्यायावर क्लिक करणे.

-ॲक्टीवेशन पूर्ण करण्यासाठी सदस्यास Netflix वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाणार.

-एअरटेलचे २ फॅमिली प्लॅन

टेलिकॉम ऑपरेटर हे अलीकडच्या काळात नेटफ्लिक्स स्टँडर्ड प्लॅनबरोबरच २ एअरटेल पोस्टपेड फॅमिली प्लॅनचे 1११९९ आणि १५९९ रुपयांचे प्लॅन आणले आहेत. शिवाय, १५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन, ५००GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर, अमर्यादित कॉल्स, मोफत सुविधा राहणार आहे. Disney + Hotstar , Airtel Xtreme सबस्क्रिप्शन, अमर्यादित कॉल्स आणि हँडसेट संरक्षणाबरोबरच मोफत अॅड-ऑन कनेक्शन देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.