सासू-सुनेच्या नात्यात अशाप्रकारे वाढवा गोडवा !

लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवीन नवरीला मायेने जपणारे कुणीतरी हवे असते.
Relationship tips in Marathi, Happy Family Tips
Relationship tips in Marathi, Happy Family Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवीन नवरीला मायेने जपणारे कुणीतरी हवे असते. आपल्या जोडीदाराला (Partner) त्याक्षणला कितीही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्या सांगता येत नाही.(Relationship tips in Marathi)

हे देखील पहा -

सासू म्हटलं की, आपल्याला मनोरंजनात असणारी सासू दिसू लागते व आपण सासूबद्दल तसेच मत बनवत जातो. त्यामुळे आपल्या नात्यात अधिक ताण निर्माण होत असतो. लग्न झाल्यानंतर नवीन नवरी ज्याक्षणी आपल्या सासरी पाऊल टाकते त्याक्षणापासून तिच्यासाठी नवीन चॅलेज सुरू होते. सासुसोबत आपले संबंध बनवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. हे नातं अधिक खडतर असल तरी यासोबत जगणारे क्षण हे सुंदर असतात. बऱ्याचदा या नात्यातही अधिक चढ- उतार येत असतात त्यासाठी या नात्यात गोडवा कसा आणायचा हे पाहूया.

नात्याला असे बनवा सुंदर -

१. सासू-सुनेची भांडण आपण नेहमीच ऐकली असतील त्यामुळे आपण अधिक गोंधळात असतो. बोलताना किंवा वागताना आपल्याला विचार करावा लागतो. त्यासाठी आपले नाते सुदृढ होण्यासाठी आपण आपल्या नात्याची सुरूवात ही मैत्रीने करायला हवी त्यामुळे आपल्या नात्यात प्रेम टिकून राहिल.

Relationship tips in Marathi, Happy Family Tips
मानशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर घडवू शकतात

२. जर आपल्याला एकमेकांबद्दल गैरसमज झाल्यास तो तिथल्या तिथे दूर करा. त्यामुळे आपल्या नात्यात कटूता निर्माण होऊ शकते.

३. जितका वेळ आपण आपल्या इतर कामासाठी काढतो तितकाच वेळ आपण आपल्या नात्यासाठी पण काढावा त्यामुळे आपले नाते (Relation) अजून नव्याने फुलते. एकमेकांचे चांगले वाईट गुण समजावून सांगा. त्यामुळे नाते अजून घट्ट होते.

४. एकमेकांच्या गोष्टी समजून घ्या. आपल्या नात्याबद्दल आदर करा. तसेच एकत्र खरेदी करू शकतो. नातेवाईकांना भेट द्या व एकत्र बसून मनोरंजन बघा त्यामुळे आपण मैत्रिणीच आहोत असे वाटेल. त्यामुळे आपण इतर संकटांना सामोरे जाण्यास सक्षम असतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com