Google Chrome चा वापर करता? लगेच करा हे महत्त्वपूर्ण काम, अन्यथा बसेल मोठा फटका

Google ने आपल्या कोट्यवधी युजर्सला नव्या धोक्याविषयी इशारा
Google Chrome
Google ChromeSaam Tv

वृत्तसंस्था: Google ने आपल्या कोट्यवधी युजर्सला नव्या धोक्याविषयी इशारा दिला आहे. Google Chrome मध्ये हॅकविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. या हॅकनंतर ब्राउजर अपडेट करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हॅकिंगपासून वाचण्याकरिता लगेच Google Chrome अपडेट करा. युजर्सच्या सुरक्षेसाठी Google ने नवीन अपडेट जारी केले आहे. Google ने युजर्सला त्वरित Chrome चं नवं वर्जन ९४.०.४६०६.७१ अपडेट करण्याचे सांगण्यात आले आहे. हे अपडेट सर्व Google Chrome युजर्सकरिता आहे. Windows १०, क्रोमबुक, मॅक सर्वांनाच अपडेटविषयी सांगण्यात आले आहे.

हे देखील पाहा-

- सर्वात आधी Settings मध्ये जायचे.

- Help वर क्लिक करा.

- About Google Chrome वर जा. इथे Chrome नवीन Version तपासा.

- Google Chrome Version ९४.०.४६०६.६१ किंवा यापेक्षा अधिकचे वर्जन सुरक्षित आहे.

- Google Chrome Update केल्यानंतर मशीन परत स्टार्ट करणं अतिशय आवश्यक आहे.

Google Chrome
जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...

Google ने झिरो-डे या धोकादायक बगविषयी इशारा दिला आहे. हा केवळ एक बग नसून एकूण ४ आहे. यामध्ये २ सर्वात मोठे धोकादायक आहेत आणि त्यांना जास्त महत्वाचे असणारे बग सांगण्यात आले आहे. झिरो-डे एक्सप्लॉइड म्हणजेच सायबर क्रिमिनल्स याचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम होते. महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सर्व युजर्ससाठी Google Chrome अपग्रेड आवश्यक आहे. लवकरात लवकर हे अपग्रेड करणे फायद्याचे ठरणार आहे. अन्यथा युजरचा डेटा धोक्यात येऊ शकतो. हॅकर्स युजर्सच्या कंप्यूटरमधून त्यांचा डेटा आणि इतर माहिती चोरी करू शकतात.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com