Google News: गुगलचं मोठं पाऊल, १ लाखांहून अधिक आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला

गुगलने नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत जून २०२२ मध्ये १ लाख ११ हजार ४९३ आक्षेपार्ह मजकूर आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे.
Google news
Google news saam tv

Google News: गुगलने नवीन आयटी नियम २०२१ अंतर्गत जून २०२२ मध्ये १ लाख ११ हजार ४९३ आक्षेपार्ह मजकूर आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. गुगलने (Google) यूजर्सने दाखल केलेल्या ३२ हजार ७१७ तक्रारींवर कारवाई करताना उचलले आहे.

Google news
लग्नानंतर गूगलवर या विचित्र गोष्टी सर्च करतात महिला; उत्तर वाचून तुम्ही व्हाल थक्क

Google कडून हटवण्यात आलेला मजकूर कॉपीराइट उल्लंघन, ट्रेडमार्क, न्यायालयाचा आदेश, ग्राफिक लैंगिक संबंधी मजकूर, फसवणूक आणि अन्य प्रकरणांशी संबंधित आहे. आयएनसी २४ च्या रिपोर्टनुसार, जूनमध्ये गुगलने कॉपीराइट मुद्द्यांविरोधात (९६.०१ टक्के) सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्याचवेळी इंटरनेट कंपनीला देशातील नागरिकांकडून विविध गुगल प्लॅटफॉर्मवर एक्स्टर्नल कॉन्टेंटसंबंधी ३२ हजार ७१७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यावर त्यांच्या खासगी आणि क्षेत्रीय कायदेविषयक अधिकारांचे उल्लंघन आहे, असे गुगल कंपनीचे म्हणणे आहे. या तक्रारींचे अनेक प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते.

गुगलने एएनआयला दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये विविध प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. काही तक्रारी या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या अधिकारांसंबंधी होत्या. तर अन्य तक्रारींमध्ये स्थानिक नियमांचे उल्लंघन, म्हणजेच मानहानीसारख्या तक्रारी होत्या.

Google news
Hair care tips : केसांची चमक वाढवायची आहे? केसांचे आयु जपायचे आहे ? आहारात या ५ प्रथिनांचा समावेश अवश्य करा

गुगलने सांगितले की, आपल्या ऑटोमेटेड डिटेक्शन प्रोसेसच्या अंतर्गत त्यांनी देशात ५ लाख २८ हजार ८४६ खाते हटवले आहेत. आम्ही ऑनलाइन आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो. तसेच आपल्या प्लॅटफॉर्मवर त्याचा शोध घेण्यासाठी आणि तसा मजकूर हटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.

गुगलने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, आमची काही यंत्रणा आहे जी बाललैंगिक शोषणसंबंधी आणि चिथावणीखोर मजकूर म्हणजेच आक्षेपार्ह माहितीचा प्रसार रोखण्यासाठी ऑटोमेटेड डिटेक्शन प्रोसेसचा वापर करतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com