Government Investment Scheme : नवीन वर्षात करा सरकारच्या 'या' 2 योजनेत गुंतवणूक, रिटायरमेंटनंतरही मिळतील अनेक लाभ

येणाऱ्या नव्या वर्षात आपण सगळेच काहीना काही प्लान करणार आहोत. त्यातील एक गुंतवणूक.
Government Investment Scheme
Government Investment SchemeSaam Tv

Government Investment Scheme : नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत त्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहोत. येणाऱ्या नव्या वर्षात आपण सगळेच काहीना काही प्लान करणार आहोत. त्यातील एक गुंतवणूक. गुंतवणूक करण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो परंतु योग्य गुंतवणूक कधी व कशी करायची हे प्रत्येकाला माहित नाही.

समजा जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यास आणि तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर जिथून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत असेल, त्या ठिकाणी गुंतवणूक करा. यासाठी तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि पंतप्रधान वय वंदना योजनेत गुंतवणूक करू शकता. या सरकारच्या योजनेत जोखीम नगण्य आहे. जर तुमच्या जोडीदाराचे वयही ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही दोघेही तुमचे पैसे (Money) या योजनांमध्ये गुंतवू शकता.

Government Investment Scheme
New Year Investment Tips : नवीन वर्षात गुंतवणूक करायची आहे ? तर 'या' 10 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !

या दोन्ही योजनांना वार्षिक ७.४ टक्के परतावा मिळतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) चा कालावधी 3 वर्षांचा आहे, जो आणखी 3 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. PM वय वंदना योजनेचा (PMVVY) कार्यकाळ 10 वर्षांचा आहे. जर तुम्ही सेवानिवृत्त असाल आणि तुम्हाला स्थिर उत्पन्न हवे असेल तर दोन्ही योजनेना तुम्ही तुमची पहिली पसंती बनू शकता.

1. किती आणि कशी गुंतवणूक करता येईल

  • एखादी व्यक्ती योजनेत फक्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. म्हणजेच दोन्ही योजनांमध्ये 30 लाख रुपये एकत्र गुंतवले जाऊ शकतात. तसेच, संयुक्त खात्याच्या बाबतीत गोष्टी बदलतात.

  • जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला (Partner) दोन्ही योजनांमध्ये संयुक्त खाते उघडायचे असेल तर तुम्ही एकाच योजनेत 30 लाख रुपये गुंतवू शकता.

  • त्याचप्रमाणे दुसऱ्या योजनेतही ३० लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.

  • म्हणजेच, जर तुम्ही दोन्ही योजनांमध्ये संयुक्त खाते उघडले तर तुम्ही एकूण 60 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता.

  • दोन्ही योजनांमध्ये, एक प्राथमिक खातेदार असेल आणि दुसरा दुय्यम असेल.

Investment
Investment Canva

2. तुम्हाला किती परतावा मिळेल?

  • सध्या या दोन्ही योजनांवर ७.४ टक्के परतावा मिळत आहे. याचा अर्थ असा की संयुक्त खाते उघडल्यावर तुम्हाला 1.11-1.11 लाख रुपये मिळतील.

  • त्याचप्रमाणे दुसऱ्या योजनेतूनही तेवढीच रक्कम मिळणार आहे.

  • एकंदरीत, तुम्हाला एका वर्षात 4.44 लाख रुपयांचा परतावा दिला जाईल.

  • महिन्यात बघितले तर जवळपास 36-37 हजार आहेत.

  • PMVVI दरमहा व्याज घेण्याचा पर्याय देते परंतु SCSS मध्ये तुम्हाला फक्त तिमाही व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला त्यानुसार मासिक खर्चाचे व्यवस्थापन करावे लागेल.

3. इतर गुंतवणुकीचे पर्याय काय आहेत

  • या दोन व्यतिरिक्त, तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, आरबीआय फ्लोटिंग रेट बाँड्स आणि डेट फंड्समध्ये देखील गुंतवणूक करू शकता.

  • तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की, जरी तुमचे ध्येय निश्चित उत्पन्न मिळवणे हे असले तरी तुम्ही तुमचा सर्व निधी या पर्यायांमध्ये गुंतवू नये कारण एखाद्या दिवशी त्यांचे व्याजदर खाली येतील आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com