Mobile Number For Billing : सरकारचा नवा नियम ! आता सामान खरेदी करताना दुकानदाराला मोबाइल नंबर देण्याची गरज नाही...

Consumer Affairs Ministry : बिलिंग करण्याची वेळ आली की, कोणत्याही स्टोअरमध्ये आपल्याकडून दुकानदार आपली वैयक्तिक माहीती व मोबाइल नंबर मागतो.
Mobile Number For Billing
Mobile Number For BillingSaam Tv

Is it mandatory to give mobile number while shopping : सामान खरेदी केल्यानंतर लांबलचक रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर बिलिंग करण्याची वेळ आली की, कोणत्याही स्टोअरमध्ये आपल्याकडून दुकानदार आपली वैयक्तिक माहीती व मोबाइल नंबर मागतो. त्यामुळे एकतर आपण त्याच्याशी वाद घालतो किंवा गुपचूप त्याला तो मागेल ती माहीत देतो.

परंतु केंद्र सरकारने (Government )जारी केलेल्या नव्या नियमानुसार व ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. सरकारने सांगितले की, अनेक किरकोळ विक्रेत्यांनी त्यांचा मोबाइल (Mobile) नंबर शेअर करण्यास नकार दिल्यास त्यांना सेवा दिली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Mobile Number For Billing
Types Of Loans: सावधान! कर्ज काढताय ? होऊ शकते लाखोंच नुकसान, गुड आणि बॅड लोनबाबत माहीतेय का ?

1. वैयक्तिक क्रमांकाशिवाय बिल बनवू शकत नाही.

ग्राहक व्यवहाराचे सचिव म्हणतात, विक्रेत्यांचे म्हणणे असे आहे की, जोपर्यंत वैयक्तिक क्रमांक देत नाही तोपर्यंत बिल बनवता येणार नाही. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ही अनुचित आणि प्रतिबंधात्मक व्यापाराची प्रथा आहे. त्याची माहीती (information) गोळा करण्यामागे कोणतेही तर्क नसतात. त्यांना फक्त आपल्या माहीतीची गोपनीयतेची काळजी घेणे अधिक गरजेचे असते. त्यामुळे, ग्राहकांच्या हितासाठी या समस्येचे निराकरण करण्यासाठी रिटेल उद्योग आणि उद्योग संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आणि FICCI यांना नियम जारी करण्यात आला आहे.

Mobile Number For Billing
UPI Payment Using Credit Card : आता क्रेडिट कार्डनेही करता येणार UPI पेमेंट ! या 5 स्टेप फॉलो करा

आता देशात कोणत्याही ग्राहकाला बिल तयार करण्यासाठी विक्रेत्याला तुमचा मोबाइल नंबर देण्याची गरज नाही. बरेचदा विक्रेते व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपला नंबर मागतात त्यामुळे ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या नियमानुसार आता ग्राहकांना खरेदी करताना कोणताही त्रास होणार नाही

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com