
Green Chana Benefits : हिवाळ्यात भाज्यांचे अनेक पर्याय असतात. खाण्याच्या शौकीन लोकांसाठी हा ऋतू खास असतो. या ऋतूत लोक लवकर आजारी पडत असले तरी आहारात काही गोष्टींचा समावेश करून निरोगी राहू शकतात.
या ऋतूमध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या उपलब्ध असतात, त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्याच्या आहारात हरभऱ्याचा समावेश करता येतो. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. चला जाणून घेऊया, हरभऱ्याचे फायदे.
1. हृदयासाठी फायदेशीर (Heart care tips)
थंडी मध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढते. हिरवे चणे हृदयासाठी उत्तम आहे .यात संतृप्त चरबी(saturated fat)आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. हे हृदयासाठी फायदेशीर (Benefits) आहे.
2. फायबर
हिरव्या चण्यामध्ये खूप फायबर आहे . यामुळे पोट भरलेलं राहाते. हे पचन लवकर होते. यामुळे वजन ही वाढत नाही.
3. प्रथिने
हरभऱ्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश केलाच पाहिजे. हे स्नायूंच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते.
4. फोलेट
त्यात व्हिटॅमिन (Vitamins)-बी 9 म्हणजेच फोलेट असते. याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. तुम्ही ते अनेक प्रकारे अन्नामध्ये समाविष्ट करू शकता. तुम्ही पराठा किंवा भाजीच्या स्वरूपातही खाऊ शकता.
अशा प्रकारे आहारात हरभऱ्याचा समावेश करा
हरभरा कोशिंबीर म्हणूनही खाऊ शकतो.
ते प्रेशर कुकरमध्ये उकळा आणि त्यात मीठ आणि लिंबाचा रस मिसळून तुम्ही ते सेवन करू शकता.
हरभऱ्याची भाजी किंवा पराठा बनवूनही खाऊ शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.