रात्री झोपेत पाय हलवायची सवय आहे? या जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते...

आपल्याला अश्या काही शारीरिक समस्या असतात, ज्या ऐकण्यात खूप विचित्र असतात. जेव्हा या समस्या होतात तेव्हा वेदना तर होतेच पण चिडचिड देखील होते.
Restless Legs Syndrome
Restless Legs SyndromeSaam Tv

आपल्याला अश्या काही शारीरिक समस्या असतात, ज्या ऐकण्यात खूप विचित्र असतात. जेव्हा या समस्या होतात तेव्हा वेदना तर होतेच पण चिडचिड देखील होते. रात्री झोपताना किंवा झोपेत पाय हलवणे (Restless Legs Syndrome) ही देखील अशीच समस्या मानली जाते. आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे थकवा आल्याने किंवा शरीरातील आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे असे घडू शकते.

पण तुम्ही हे जाणूनबुजून करत नसला तरी तुमच्यासोबत झोपलेल्या एखाद्या व्यक्तीला याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे रुग्ण अनेकदा या त्रासाचा सामना करत असतात. परंतु शरीरात नसलेल्या अनेक जीवनसत्त्वांची कमतरता (Vitamins deficiency) तुम्हाला याचा बळी बनवू शकते. या समस्येने तुम्हाला रेस्टलेस लेग्स सिंड्रोममुळे होऊ शकतो, ज्यामध्ये व्यक्ती झोपेत असतानाही अस्वस्थ वाटत असते.

1) व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता;

शरीरात या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताभिसरणावर (Blood Circulation) परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. शरीरात रक्तप्रवाहात अडथळे येत असतील तर ते या अस्वस्थतेचे कारण बनते आणि काही लोक रात्री झोपल्यानंतर पाय हलवतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता कमी करण्यासाठी तुम्ही शेंगदाणे, बीन्स आणि पालक यासारख्या हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता.

2) व्हिटॅमिन सी ची कमतरता;

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता (Deficiency Of Vitamin C) असल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमकुवत होऊ लागते. प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे तुमच्या रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. तर, पाय दुखणे लोहाच्या (Iron) कमतरतेमुळे होते आणि हे जीवनसत्व लोहाचे शोषण सुधारत असते. जर त्याचे प्रमाण कमी केले तर शरीरातील लोहावर परिणाम होईल आणि परिणामी तुम्हाला पाय दुखण्याची समस्या होईल.

3) व्हिटॅमिन डी ची कमतरता;

आता सर्व लोकांना माहित आहे की शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. यामुळे पाय, हात किंवा सांधे दुखू लागतात. शरीरात या आवश्यक जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे, स्नायूंचा ताण वाढतो. शरीरातील या जीवनसत्त्वाची कमतरता तुम्ही सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाद्वारे पूर्ण करू शकता. याशिवाय त्याची उपलब्धता अन्नातूनही वाढवता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com