Habits Cause Joint Pain : या चुकीच्या सवयींमुळे जडू शकतात हाडांचे विकार, जाणून घ्या त्याबद्दल

तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या रोजच्या अशा काही सवयींमुळे तुमची हाडे ठिसूळ होत चालली आहेत
Habits Cause Joint Pain
Habits Cause Joint PainSaam Tv

Habits Cause Joint Pain : धावपळीच्या या जीवनात अनेक लोकांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळचं उरत नाही. अशातच वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत बऱ्याच लोकांना हाडांचा आजार जडलेला असतो.

त्याचबरोबर ज्यांना गाठी झालेल्या असतात अशा लोकांमध्ये हाडांच दुःखण जास्त प्रमाणात दिसून येत. पण तुम्हाला माहीत आहे का ? तुमच्या रोजच्या अशा काही सवयींमुळे तुमची हाडे ठिसूळ होत चालली असून तुम्हाला हाडांचे आजार जडत आहेत.

दैनंदिन कामकाजामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो. अशातच आपण अनेक कामे देखील करतो. कामाचा ताण आपल्या शरीरावर पडतो आणि आपले सांधे दुखू लागतात. आपल्या शरीरातील हाडांच्या आसपास असलेल्या मासपेशी, टेंडन आणि लीगामेंट्सच्या कमजोरीमुळे हाडांच्या आसपास असलेले कार्टीलेज आणि हाडांची झीज होऊ लागते. त्याचबरोबर तुमच्या रोजच्या अशा काही सवयी आहेत. ज्यामुळे हाडांचे विकार होणे याचे संकेत येऊ लागतात. जाणून घेऊया त्याबद्दल...

Habits Cause Joint Pain
Joint Pain Relief: हिवाळ्यात करा 'या' 4 पदार्थांचे सेवन गुडघेदुखीपासून मिळेल आराम !

1. धुम्रपान

धूम्रपान करणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. धूम्रपान केल्याने तुमच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना नुकसान पोहोचू शकते. त्याचबरोबर हाडांवर देखील धुम्रपानाच्या चुकीचा प्रभाव पडतो. सिगारेटमध्ये निकोटिन असते जे रक्तामधील वेसेल्सला संकुचित करते आणि आपल्या हाडांपर्यंत ऑक्सीजन आणि काही पोषक तत्वांचे प्रमाण कमी करते.

2. वेदनाकडे दुर्लक्ष करु नका

तुम्ही तुमच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं तर ते तुमच्यासाठी अत्यंत नुकसानदाई ठरू शकते. हाडांचे दुखणे (Pain) अनेक कारणांमुळे होऊ शकते. ज्यामध्ये जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने आणि चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यामुळे होऊ शकते. यामुळे तुमच्या पूर्ण शरीरामध्ये आणि हाडांसह अंगामध्ये विषेश दुखणे होऊ शकते. बऱ्याचदा हे दुःखणे लवकर ठीक होऊन जात. पण तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःच नुकसान करून घेऊ नये.

Joint Pain
Joint Pain canva

3. अतिप्रमाणात व्यायाम

व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी (Health) फायदेशीर (Benefits) असतेचं. परंतु जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने देखील तुमच्या हाडांमधील दुखणे वाढू शकते. जर तुम्ही नवीनचं जिम सुरु करत असाल तर तुम्ही हळू हळू आणि साध्या पद्धतीने सुरु करावे. याशिवाय तुम्ही हलकी स्ट्रेचिंग आणि रानींगची सुरुवात करू शकता.

4. तणाव

तुम्हाला एखाद्या गोष्टीचा तणाव असेल तर तो तुमच्या हाडांच्या विकरांचे कारण बनू शकतो. ताणतणावामुळे तुमच्या शरीरात एक असं रसायन निर्माण होते जे तुमच्या हाडांमध्ये सूज निर्माण करू शकते.

5. सतत टेक्सट करणे

तुम्ही जास्त प्रमाणात टेक्सटिंग म्हाजेच टाइप करत असाल तर ते तुमच्या हाडांवर ताण आणू शकते. जास्त प्रमाणात मसेज टाइप करणे हे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नसते. त्या्याबरोबर तुमच्या खाण्यामध्ये पेस्ट्री, फ्रेंच फ्राईज, रेड मीट एकंदरीत फास्ट फूड अशा ज्वलनशील पदार्थांच्या (Food) सेवनामुळे तुमच्या हाडांची अवस्था खराब करू शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com