Hair care tips : केसांची चमक वाढवायची आहे? केसांचे आयु जपायचे आहे ? आहारात या ५ प्रथिनांचा समावेश अवश्य करा

केसांच्या वाढीसाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
Hair falls problem, Hair care tips, Haircare, Protein food
Hair falls problem, Hair care tips, Haircare, Protein foodब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केस वाढवण्यासाठी किंवा ते चमकदार होण्यासाठी आपण त्यावर अनेक केमिकल पदार्थांचा वापर करत असतो परंतु, त्यामुळे केसांवर त्याचा विपरित परिणाम होऊन केसांची वाढ खुंटते.

हे देखील पहा -

केसांची चांगली स्वच्छता, केसांची रचना व केसांची काळजी घेणारे उत्पादनाचा वापर केल्यास केस अधिक तुटण्याची भीती असते. आपले केस मजबूत, लवचिक व जाड बनवण्यासाठी आपल्याला आहारात अनेक पदार्थाचे सेवन करायला हवे. केसांच्या समस्येमध्ये ते अकाली पिकतात, गळू लागतात किंवा त्याचा वाढ खुंटते त्यामुळे आपण त्रस्त असतो. आपण आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास केसांना पोषण मिळेल व केस निरोगी राहण्यास मदत होईल. आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.

१. पालक ही सर्वात पौष्टिक अशी हिरव्या भाज्यांपैकी एक आहे. यात जीवनसत्त्व ए, के आणि जीवनसत्त्व क सारखे पोषक तत्व आहेत. जे केसांच्या फॉलिक सेलचे संरक्षण करतात व त्याची देखभाल करतात.

२. सबजा हे पौष्टिकतेचे पावर हाऊस मानले जाते. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने व इतर अनेक आवश्यक खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे सुंदर आणि लज्जतदार केसांना (Hair) प्रोत्साहन मिळते. यासाठी आपण आहारात तृणधान्ये, पुडिंग्ज, स्मूदीज, सॅलड्स जोडू शकतो.

Hair falls problem, Hair care tips, Haircare, Protein food
Hair care tips : केस सतत गळताय, या पाण्याने केस धुतल्यास मिळतील अनेक फायदे !

३. आपण आहारात कडधान्याचा समावेश करायला हवा. मसूर हे शाकाहारी प्रथिने, फायबर, फॉस्फरस आणि फॉलीक ऍसिडचा उत्तम स्रोत आहे. हे पोषक टाळूला ऑक्सिजन पुरवण्याचे आणि केसांच्या वाढीस उत्तेजन देण्याचे कार्य करतात. केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या एकूण आरोग्यासाठी मसूरमधील प्रथिने महत्त्वपूर्ण आहेत.

४. आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की सॅल्मनमध्ये उच्च-गुणवत्तेचे प्रथिने आणि ओमेगा -३ फॅटी ऍसिड असतात जे आपल्या टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे केसांचे आरोग्य (Health) आणि वाढ दोन्हीसाठी चांगले वातावरण प्रदान करते.

५. अंडी हे प्रथिने आणि बायोटिनचे एक उत्तम स्रोत आहेत, केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेले पोषक घटक आहे. केसांच्या वाढीसाठी पुरेसे प्रथिने खाणे महत्वाचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com