
Hair Fall: सध्या सर्वत्र प्रदूषण मोठ्या प्रमाणावर पसरलं आहे. त्यामुळे माणसाच्या आरोग्यावर देखील याचा मोठा परिणाम होताना दिसतोय. अनेक तरुण मुलांना खूप कमी वयात केस गळण्याच्या आणि काळे केस पांढरे होण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. तरुण पिढीत केस गळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. (Latest Hairfall Tipes)
२४ ते २५ या वयातच मुलींसह मुलांना देखील केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मुलांना माथ्यावर अथवा कपाळावर टक्कल पडू लागले आहे. अशात आता गेलेले हे केस परत मिळावे यासाठी तरुण मुलं विविध प्रकारचे तेल आणि क्रिमचा वापर करतात. मात्र तरी देखील त्यांचे केस परत येत नाहीत. उलट अशा प्रकारचे क्रिम आणि शॅम्पू वापरून आहेत तेवढेही केस गळून जातात. अशात आता यावर घरातीलच काही वस्तूंचा वापर करून गेलेले केस परत मिळवण्यास मदत होऊ शकते.
जैतून तेल
जैतून तेल म्हणजे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल केस गळतीवर फार उपयुक्त आहे. तुमचे केस अगदी पूर्ण गळून गेलेले केस देखील पुन्हा मिळवण्यासाठी मदत होते. ऑलिव्ह ऑइल केसांना लावताना ते अगदी मुळांपर्यंत लावावे. याने तुम्हाला टक्कल असलेल्या जागी केस येण्यास मदत होईल.
कॅस्टर ऑईल
कॅस्टर ऑईल म्हणजे एरंडेल तेल. हे तेल देखील केस गळतीवर फार उपयुक्त आहे. याने टक्कल असेल्या भागावर केस येण्यास मदत होईल. हे तेल केसांवर लावताना आधी गरम करून घ्यावे. त्यानंतर हलक्या हाताने केसांवर आणि मुळांवर अप्लाय करावे. आठवड्यातून २ वेळा तरी हे तेल केसांना लावल्याने तुम्हाला फरक जाणवेल.
लिंबू
वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरून तरी देखील तुमची केस गळती थांबत नसेल तर त्यावर आणखीन एक उपाय आहे. केस गळूगळून त्या जागी टक्कल पडण्यास सुरुवात झाली असेल तर तेथे तुम्ही लिंबू लावू शकता. लिंबाचा रस केसांमध्ये लावल्याने केस गळणे थांवते आणि नवीन केस उगवण्यासही मदत होते.
खोबरेल तेल अन् कडिपत्ता
खोबरेल तेल तर तुम्ही नेहमीच वापरत असाल. या तेलाचे भरपूर फायदे आहेत. याने केस अगदी मुलायम देखील राहतात. मात्र तुमचे केस जास्त गळत असतील अथवा तेथे टक्कल पडू लागले असेल तर त्यावर उत्तम उपाय म्हणून तुम्ही आपल्या खोबरेल तेलात कडिपत्त्याची पाने उकळून घेऊ शकता. त्यानंतर ते तेल तुम्ही केसांवर लावू शकता. या पद्धतीनेही तुमचे केस गळणे थांबेल.
सदर उपाय हे घरगुती वस्तूंपासून तयार होतात. मात्र काही व्यक्तींना विविध व्याधी असतात. जसेकी, उच्च रक्तदाब अथवा शुगर अशा विविध समस्यांचा सामना देखील व्यक्तींना कारावा लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या तेलांचा वापर करा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.