Hair straightener side effects : थांबा ! तुम्ही देखील हेअर स्ट्रेटनरचा वापर करताय ? होऊ शकतो गर्भाशयाचा कर्करोग

हल्ली केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनरचा सरास वापर केला जातो.
Hair straightener side effects
Hair straightener side effectsSaam Tv

Hair straightener side effects : हल्ली चेहऱ्यासोबत केसांचे सौंदर्य ही जपले जाते. सणासुदीत केस स्ट्रेट करण्यासाठी बरेच जण हेअर प्रोडक्ट्सचा वापर करतात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या रासायनिक उत्पादनाचा वापर करतात.

केसांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. हल्ली केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनरचा सरास वापर केला जातो. परंतु अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, हेअर स्ट्रेटनर आणि इतर अनेक केस उत्पादनांमध्ये असलेल्या रसायनांमुळे गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. (Latest Marathi News)

Hair straightener side effects
Skin And Hair Care : त्वचा आणि केसांसाठी बहूगुणी सदाफुलीची फुलं

संशोधन काय सांगते ?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जर्नल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये असे सांगण्यात आले, ज्या स्त्रिया केसांवर हेअर स्ट्रेटनर आणि इतर अनेक हेअर प्रोडक्ट वापरतात त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. चे-जंग चांग, ​​केटी एम ओब्रायन, अलेक्झांडर पी कील, चंद्र एल जॅक्सन इत्यादींच्या टीमने हा अभ्यास केला. या अभ्यासाला यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनेही मान्यता दिली आहे.

केसांच्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म असलेली रसायने असू शकतात

मागील अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की केसांच्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्मांसह धोकादायक रसायने असू शकतात. त्यांच्या वापरामुळे स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग आणि हार्मोनल असंतुलनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. आत्तापर्यंत गर्भाशयाच्या कर्करोगावर केसांच्या उत्पादनांचे परिणाम अभ्यासले गेले नव्हते.नुकत्याच झालेल्या अभ्यासात गर्भाशयाच्या कर्करोगाशी या उत्पादनांचा संबंध तपासला गेला. या तपासणीच्या आधारे असे आढळून आले की केस सरळ करणारी उत्पादने आणि इतर केस उत्पादने गर्भाशयाच्या कर्करोगाचा (Cancer) धोका वाढवतात.

अभ्यासासाठी ३५-७४ वयोगटातील ३३९४७ महिलांचा (Women) समावेश करण्यात आला होता. सहभागींना त्यांनी मागील 12 महिन्यांत वापरलेल्या केसांच्या उत्पादनांच्या संख्येवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. यापैकी 378 महिला गर्भाशयाच्या कर्करोगाच्या बळी असल्याचे आढळून आले, ज्यांनी 12 महिन्यांत 4 वेळा केस सरळ करणे यासह इतर काही केस उत्पादनांचा वापर केला.

Hair straightener side effects
Breast Cancer : 'या' कारणांमुळे महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, वेळीच व्हा सावध..

याशिवाय, ज्या महिलांनी शारीरिक हालचाली कमी केल्या आणि एक वर्षासाठी स्ट्रेटनरचा वापर केला त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका दिसून आला. जास्त शारीरिक हालचाली करणाऱ्या आणि स्ट्रेटनर वापरणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाची प्रकरणे

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, १०० पैकी ३ महिलांना कधी ना कधी गर्भाशयाचा कर्करोग होतो. गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतापेक्षा पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त आहे.

गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत

गर्भाशयाचा कर्करोग अनेकदा लहान वयातच आढळून येतो. यामध्ये खूप रक्तस्त्राव होतो. अन्न घेत असताना पोट भरल्यासारखे वाटणे किंवा जेवताना त्रास जाणवणे, पोटदुखी, पाठदुखी इत्यादी सामान्य लक्षणे आहेत. ओटीपोटात वेदना किंवा दाब देखील जाणवू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com