
Financial Budget : कोणत्याही कठीण प्रसंगात आई ही आपल्यासोबत असते. आईशिवाय आपलं पानं हलतं नाही. आईही आपल्याला प्रत्येक वाईट काळात योग्य तो मार्ग दाखवते. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा हा मातृदिवस १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे.
अशा खास प्रसंगी आपण आईकडून आपले पैशांचे (Money) बजेट कसे राखायचे हे जाणून घेऊया घरखर्चाचे बजेट बनवणे असो, कठीण प्रसंगातही सर्व समस्या सोडवणे असो किंवा इतर बाबींमधील कोणतीही समस्या पैशाने सोडवणे असो. भविष्यातील कोणतीही गोष्ट असो आईच्या शिकवणीतून तुम्ही तुमचं बिघडलेल बजेट हाताळू शकता.
1. अर्थसंकल्प व मनी मॅनेजमेंट शिकायचे असेल तर ते एका गृहिणीकडून शिकावे. आपण पैसे कमावत असू किंवा कमावत नसलो तरी आपल्याला पॉकेटमनी ही मिळते. परंतु, त्याचा बजेट कसा मांडायचा, आपल्या खर्चाचे व्यवस्थापन कसे करायचे हे तुम्ही आईकडून शिकू शकता.
2. आई नेहमी आपल्या स्वयंपाकघरातील (Kitchen) अनेक वस्तूंमध्ये पैसे साठवते. त्यामुळे कठीण प्रसंगात ती त्या पैशांचा साहाय्याने तिचे आर्थिक बजेट सुधारते. आपणही आपल्या पॉकेट मनीतून काही पैसे हे साठवायला हवे.
3. आईचे मुख्य लक्ष भविष्य चांगले बनवण्यावर असते. बचत आणि गुंतवणूक हे नेहमीच आईचे साधन असते. मग ते मुलांच्या शिक्षणासाठी (Education) असो किंवा निवृत्तीसाठी. सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी दीर्घकालीन विचार करणे आणि बचत करणे खूप महत्त्वाचे आहे.
4. पैसा कुठे वाचवता येतो, यासाठीही खूप संयम असावा लागतो. तुमची संसाधने कशी वाढवायची आणि काटकसरीने कसे चालवायचे हे तुम्ही तुमच्या आईकडून शिकू शकता.
या मदर्स डे वर, तुमच्या आईकडून या वैयक्तिक आर्थिक टिप्स घेऊन तुम्ही स्वतःसाठी आर्थिक सुरक्षिततेची ढाल तयार करू शकता. याद्वारे, तुमच्याकडे बँकेकडे असलेल्या आपत्कालीन निधीमध्ये पैसे तर असतीलच, शिवाय तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजाही कोणत्याही काळजीशिवाय पूर्ण करू शकाल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.