Hemoglobin Decrease : तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले आहे का? डायटमध्ये 'या' 5 ड्रिंक सामील करा

Low Hemoglobin : हेल्दी लाइफस्टाइल एन्जॉय करण्यासाठी अनेक व्यक्ती न्यूट्रियन्स रीच डाएट आत्मसात करतात.
Hemoglobin Decrease
Hemoglobin DecreaseSaam Tv

Hemoglobine Level Drops : हेल्दी लाइफस्टाइल एन्जॉय करण्यासाठी अनेक व्यक्ती न्यूट्रियन्स रीच डाएट आत्मसात करतात. त्याचबरोबर अनेक व्यक्तींच्या शरीरामध्ये आयरनची कमतरता असते.

शरीरामधील आयरनची लेवल कमी झाल्याने हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची मात्रा कमी होऊ लागते. अशातच काही आयरन रिच ड्रिंक्सला तुमच्या डायटमध्ये सामील करून तुम्ही तुमच्या शरीरामध्ये रक्ताच्या कमतरतेला पूर्ण करू शकता.

शरीरामधील रक्ताची कमतरता अनेक आजारांना (Disease) आमंत्रण देते. अशामध्ये एनिमिया, ब्लड लॉस, गॅस, लो एनर्जी लेवल आणि इम्युनिटी कमजोर होण्यासारखा समस्या पाहायला मिळतात. त्यामुळे एका वृत्तवाहिनीनुसार आम्ही तुम्हाला काही आयरन रीच गोष्टींची नावे सांगणार आहोत. या ड्रिंक्स तुम्ही तुमच्या डायटमध्ये सामील करून तुमच्या आरोग्याची (Health) काळजी घेऊ शकता.

Hemoglobin Decrease
Hemoglobin Deficiency : शरीरात रक्ताची कमतरता जाणवतेय? 'या' पदार्थांचे करा सेवन

हलीम ड्रिंक -

हलीम ड्रिंक चविष्ट आणि आयरनने परिपूर्ण असते. सोबतच हलीम ड्रिंक मध्ये फोलिक एसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हलीम ड्रिंक बनवण्यासाठी सर्वात आधी अर्धा कप पाणी घ्या त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हलीम आणि दोन चमचे लिंबूचा रस मिसळावा. दोन तास झाल्यानंतर या ड्रिंकचे सेवन करा.

बीट जुस -

बिटाच्या रसामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते. याशिवाय बीटामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नीज उपलब्ध असते. अशातच बीटाचा रस बनवण्यासाठी एक बीट कापून घ्या. आता यामध्ये एक काकडी, एक अद्रक आणि थोडासा लिंबूचा रस पिळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हा ज्यूस पिल्याने शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स निर्माण होतात. नंतर ऑक्सिजन सप्लाय चांगला होतो.

पालक आणि पुदिन्याचा ज्यूस -

शरीरामध्ये आयरनची मात्रा वाढवण्यासाठी तुम्ही पालक आणि पुदिन्याचा ज्यूस पिऊ शकता. हा ज्यूस बनवण्यासाठी चार कप कापलेल्या पालकमध्ये एक कप पुदिन्याची पाने घालून त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता मिक्सरमधुन सगळे मिश्रण गाळून घ्या. यामध्ये एक चमचा लिंबू रस आणि एक चमचा जिरा पावडर मिक्स करून आईस क्यूब सोबत सर्व करा. हा ज्यूस पिल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

Hemoglobin Decrease
Hemoglobin Deficiency: शरीरात रक्ताची कमतरता जाणवते? 'या' लक्षणांवरून ओळखा

प्लमचा ज्यूस -

प्लमचा ज्यूस पिल्याने तुमच्या आरोग्य चांगले राहते. प्लममध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. सोबतच प्लमचा ज्यूस पिल्याने शरीरालामधील एनर्जी लेवल वाढते आणि बॉडीमधील ब्लड शुगर लेवलला कंट्रोल करते. हा ज्यूस बनवण्यासाठी पाच प्लममध्ये एक कप पाणी, एक चमचा लिंबूचा रस, दोन चमचे साखर टाकून चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर यामध्ये आईसक्यून टाकून प्या.

व्हेजिटेबल ज्यूस -

सगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये विटामिन, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. अशातच व्हेजिटेबल ज्यूस पिल्याने आपल्या शरीराला आयरन भेटते. यासाठी दोन कप कापलेला पालक, एक कप कापलेला दुधी भोपळा, 1/4 कप आवळा, तुमचा मर्द आणि दोन कप थंड पाणी घेऊन मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड करा. व्हेजिटेबल ज्यूस तयार आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com