Winter Health Care : कधी विचार केला आहे का? हिवाळ्यात सर्दी, खोकला व फ्लूचे रुग्ण अधिक का आढळतात ?

सर्दीच नाही तर अनेक आजारांचा सामना हिवाळ्यात करावा लागतो पण असे का होते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?
Winter Health Care
Winter Health CareSaam Tv

Winter Health Care : हिवाळा सुरु झाला की, अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्भवू लागतो.वातावरणातील बदलामुळे अचानक आपण आजारी पडायला लागतो. त्यामुळेच सर्दी प्रत्येकाला होत असेल असे आपल्या वाटते पण नुस्ती सर्दीच नाही तर अनेक आजारांचा सामना हिवाळ्यात करावा लागतो पण असे का होते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

हिवाळ्यात आपली इम्यूनिटी कमी होते त्यामुळे बॅक्टिरिया सहज ते आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, थंड हवामानात प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे विषाणू नाकाच्या पेशींना चिकटून राहतात, ज्यामुळे संसर्ग होतो.

Winter Health Care
Winter Hair care : हिवाळ्यात केसांची चमक टिकावयची आहे ? 'या' टिप्स फॉलो करा

फ्लू होण्यापासून बचाव कसा करायचा?

फ्लू पासून सावध राहण्यासाठी मास्कचा (Mask) वापर करा.तुमच्या आहारात व्हिटॅमिन, मिनिरलस,प्रोटीन यांचा समावेश करा जेणेकरून तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्याची शक्ती मिळेल.दिवसातून ५ ते ६ वेळा हात वॉश करा आणि डोळे,नाक,चेहेरा स्पर्श करू नका.

Winter Health Care
Winter Health Carecanva

जर तुम्हाला हे लक्षण दिसत असतील तर डॉक्टरांना लगेच भेट द्या

१.श्वास घेण्यास समस्या येत असेल.

२. तीव्र छाती आणि पोटदुःखी

३. मांसपेशीत वेतना आणि कमजोरी जाणवत असेल

४. लघवी करण्यात अडचण

५. दर काही दिवसांनी ताप किंवा खोकला परत येणे

६.सतत चक्कर येणे

७. डोळे (Eye) जळजळ करणे,गुडघे दुःखी, घशात खव खवणे

८. डोके दुखी,त्वचेवर लाल चट्टे,उलटी होणे,शरीरात तापमान चे प्रमाण वाढणे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com