Headache Problem : तीव्र डोकेदुखीचा समस्या जाणवते आहे ? मिनिटांत गायब होईल डोकेदुखी हे करुन पहा

सतत डोकेदुखी होत असल्यास काय करायला हवे ?
Headache Problem, Health Issue
Headache Problem, Health Issue Saam Tv

Headache Problem : अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा बदलेली जीवनशैली यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक म्हणजे डोकेदुखी.

हे देखील पहा-

डोकेदुखी (Headache) सुरु झाली की, ती काही थांबायचे नाव घेत नाही. हवामानातील बदलामुळे, सर्दी किंवा ऑफिसची (Office) डेडलाईन यांमुळे अनेकदा आपले डोकेदुखी वाढते. अशावेळी आपल्याला नेमके काय करावे हे सुचत नाही. परंतु, जर ही डोकेदुखी तीव्र प्रमाणात वाढत गेली तर आपण औषधांना जवळ करतो. मात्र, या असह्य डोकेदुखीसाठी फक्त चहाचे सेवन पुरेसे असते. काही खास चहाचा वापर आपण त्यावेळीस प्यायल्यास या त्रासावर मात करता येऊ शकते.

१. आल्याचा चहा डोकेदुखी दूर करण्यास मदत करतो. यातील दाहक-विरोधी घटक पचनशक्ती वाढवण्यासही मदत करतात. आपण दुपारी न जेवल्यामुळे आपल्याला हा त्रास जाणवू लागतो त्यावेळी आल्याचा चहा प्यायल्याने आपल्याला मदत होईल.

२. तुळशीचा चहा मायग्रेनवर एक अप्रतिम उपाय आहे. तुळशीच्या पानांचा चहा बनवून प्यायल्याने डोकेदुखी दूर होण्यास मदत होते. आयुर्वेदात तुळशीला अधिक महत्त्व आहे. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही तुळशी खूप प्रभावी आहे.

Headache Problem, Health Issue
Piles Symptoms : अवघड जागेचं दुखणं मूळव्याध, तो कसा होतो ? त्याची कारणे व लक्षणे जाणून घ्या

३. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशिअम हाडे मजबूत करतात. याचा चहा प्यायल्याने गॅस्ट्रिक समस्या, तणाव आणि चिंता बरे करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे डोकेदुखी दूर होण्यासही मदत होते.

४. ग्रीन टी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. हे स्नायूंना बळकट करण्यास आणि शरीरातील वेदना कमी करण्यास देखील मदत करते.

५. लॅव्हेंडर चहा शरीराला डिटॉक्स कमी करण्यास, डोकेदुखी आणि मायग्रेनची लक्षणे कमी करण्यास मदत करते. हे झोप आणि विश्रांती वाढविण्यात देखील मदत करते. यामुळे सतत होणारा डोकेदुखीचा त्रास कमी होईल.

६. कॅमोमाइल चहा कॅफीन रहित आहे आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेला आहे. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चालना देण्यास आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com