Health Alert : ध्रुमपान करताय, सावधान! घातक सवयीने शुक्राणूंचा डीएनए बदलतोय; अनेकांना जडतोय 'हा' गंभीर आजार

सध्या पुरुषांची जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल होत आहे. त्याच्या परिणाम पुरुषांच्या आरोग्यावर होत आहे
Infertility in Male
Infertility in Male Saam Tv

औरंगाबाद : सध्या पुरुषांची जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल होत आहे. त्याच्या परिणाम पुरुषांच्या आरोग्यावर होत आहे. अलीकडे इनफर्टिलिटी आणि बाळाच्या जन्मानंतर त्याला वेगवेगळे आजार होणे ही एक समस्या झाली आहे. त्याचं कारण म्हणजे दैनंदिन जीवनशैली आणि कामाच्या ओझ्याने पुरुषांच्या शुक्राणूंचा डीएनए बदलतोय

Infertility in Male
Parenting Tips : तुमचे मुलही हेल्दी पदार्थ खाण्यापिण्यास नाटक करते ? 'हे' एनर्जी बूस्टिंग स्नॅक्स ठरतील फायदेशीर !

ऑफिसमधल्या कामाचा ताण, घरातील आर्थिक अडचण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे पुरुषांच्या डीएनएमध्ये सातत्याने बदल होतायत. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळामध्येही अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहेत. इतकंच नाही तर ऐन तारुण्यांमध्ये इंफर्टिलिटीचा सामना करावा लागत आहे.

डीएनए सतत बदलण्यास शुक्राणू फ्रेगमेंटेशनही म्हटले जाते. यामुळे महिलांना गर्भधारणा करण्यास कठीण होते. मॅन अँड मिसकॅरेजच्या अहवालात म्हटले आहे की, महिलांमध्ये सतत गर्भपात होण्यास अधिक प्रमाणात पुरुष जबाबदार आहेत. पुरुषांमध्ये (Man) ही स्थिती सतत तणावात राहिल्यामुळे निर्माण होते. गर्भधारणेशी संबंधित ५० टक्के प्रकरणांमध्ये हेच कारण प्रमुख आहे. प्रत्येक सहापैकी एक गर्भपात हा पुरुषाच्या खराब शुक्राणूच्या कारणामुळे होत आहे.

Infertility in Male
Cholesterol Side Effects : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकते दूरदृष्टी कमकुवत, चूकनही 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका !

सध्या कामाच्या ओझ्यामुळे तरुण अतिशय तणावात आहे. यामुळे ते धूम्रपान आणि मद्यपान करतात. यामुळे ताण आणखी वाढतो. ताण वाढला की शुक्राणूमध्ये अँटिऑक्सिडंट्सचा स्तर कमी होण्यास सुरुवात होते.

खराब शुक्राणूमुळे पुरुषांच्या मूल जन्माला घालण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्यासह जन्माला येणाऱ्या बाळात अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. त्यामुळे जीवनशैलीमध्ये (Lifestyle) बदल करावा,योगासने करावीत, नियमित आहार घ्यावा, व्यसनापासून दूर राहावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com