Health Tips : वाढलेल्या स्तनांमुळे होऊ शकतो गंभीर आजार ! शरीराच्या 'या' भागात चरबी जमणे अधिक हानिकारक

जर कोणी कॅलरीज बर्न करत नसेल तर त्या अतिरिक्त कॅलरी शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात.
Health Tips
Health TipsSaam Tv

Health Tips : बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या देखील उद्भवतात. जेव्हा एखादी व्यक्ती शरीराला आवश्यकतापेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीची सेवन करते तेव्हा शरीरात चरबी जमा होऊ लागते.

जास्त कॅलरीज घेत असेल तर त्याला शारीरिक हालचाली करून त्या कॅलरीज बर्न कराव्या लागतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहाते. दुसरीकडे, जर कोणी कॅलरीज बर्न करत नसेल तर त्या अतिरिक्त कॅलरी शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात. डॉ. सारा बेरी, लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील पोषण विज्ञानाच्या सहाय्यक प्राध्यापिका यांनी टेलिग्राफला मुलाखत दिली. मुलाखतीत डॉ. सारा म्हणाल्या, शरीरात साठलेल्या विशिष्ट प्रकारच्या चरबीमुळे गंभीर परिस्थितीचा धोका वाढू शकतो.

Health Tips
Breast Size : स्तनांचा आकार वाढलाय ? 'हे' घरगुती उपाय करा, व्यायामाची कटकट नको!

व्हिसेरल फॅट जमा झाल्यामुळे शरीरात हानिकारक रसायनांचे उत्पादन वाढते, ज्यामुळे जळजळ, टाइप 2 मधुमेह सारखे रोग होऊ शकतात. अनेक लोक त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये जमा झालेल्या चरबीमुळे त्रासलेले असतात. महिलांच्या शरीरात साठलेली चरबी त्यांच्या आरोग्याचे रहस्य सांगते. शरीराच्या कोणत्या भागात साठवलेली चरबी फायदेशीर आहे आणि कोणत्या भागात साठवलेली चरबी धोकादायक आहे, हे देखील जाणून घ्या.

1. नितंब आणि मांड्या

द सनच्या रिपोर्टनुसार, नितंबांवर चरबी जमा होणे चांगले मानले जाते. तज्ज्ञांचे मत आहे की हिप्सच्या भागात चरबी जमा होणे शरीरासाठी फायदेशीर आहे, परंतु चरबी इतके वाढू नये की ते स्नायूंना दाबू लागतील. फ्लोरिडा हॉस्पिटल सॅनफोर्ड बर्नहॅम ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मेटाबोलिझम अँड डायबिटीजच्या तज्ज्ञांनी नितंबांच्या चरबीची तपासणी केली. प्रमुख संशोधक डॉ. स्टीव्हन स्मिथ यांच्या मते, नितंबांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो. ज्या महिलांना (Women) हृदयविकाराचा झटका येतो त्यांच्या मांडीच्या तुलनेत पोटाच्या भागात जास्त चरबी असते.

2. ब्रेस्ट फॅट (Breast fat)

तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये स्तनाचा आकार वाढल्याने अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. 2008 मध्ये केलेल्या संशोधनानुसार, मोठे स्तन असलेल्या 20 वर्षांच्या मुलींना पुढील 10 वर्षांत मधुमेहाचा धोका वाढला होता. 2012 मध्ये, शास्त्रज्ञांना असे आढळले की मोठ्या स्तनांपासून कोणताही धोका नाही, परंतु त्यांनी व्हिसेरल चरबी जमा होण्याचा धोका वाढवला. वय, गर्भधारणा, स्तनपान आणि अनुवांशिक इतिहासाचा विचार न करताही मोठे स्तन असलेल्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. BMV मेडिकल जेनेटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, स्तन मोठे होण्याचे कारण आनुवंशिकता होते.

Body Fat
Body Fat Saam Tv

3. पोटाची चरबी

व्हिसरल फॅट ही सर्वात धोकादायक चरबी मानली जाते ज्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि कर्करोगाचा धोका वाढतो. यामुळे नैराश्य, स्मृतिभ्रंश आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो. व्हिसेरल चरबी प्रामुख्याने पोटाच्या आणि पाठीच्या खालच्या भागात जमा होते. या चरबीमुळे पोटाचा आकार बराच वाढतो. ज्या महिलांच्या कंबरेचा आकार त्यांच्या नितंबांपेक्षा मोठा असतो त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की, कंबरेचा आकार आणि नितंबांपेक्षा मोठा कंबर असलेल्या महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 10-20 टक्के जास्त असतो. कंबरेचा आकार कमी करण्यासाठी कर्बोदकांचे प्रमाण कमी करावे आणि प्रथिनेयुक्त अन्नाचे प्रमाण वाढवावे. पोहणे, सायकलिंग, वजन प्रशिक्षण आणि धावणे इत्यादी वर्कआउट्स कंबरेचा आकार कमी करू शकतात आणि हृदय निरोगी ठेवू शकतात.

Health Tips
Breast Cancer in Men : पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो का ? त्याची लक्षणे कशी दिसून येतात

4. मानेची चरबी

बहुतेक लोक त्यांच्या मानेच्या चरबीचा विचार करत नाहीत. संशोधकांना आढळले की मानेचा मोठा आकार शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण दर्शवतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, मानेचा घेर वाढल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो. मानेमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो आणि श्वसनसंस्थेवरही दबाव येऊ शकतो. यामुळे स्लीप एपनियासारख्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, मानेमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील कमी होऊ शकते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com