Health tips : तुम्हाला देखील मधूमेह आहे ? या मान्सून फिटनेस टिप्स फॉलो करा, अन्यथा होईल मोठे नुकसान

मधुमेह असणाऱ्यांनी पावसाळ्यात फिटनेसची काळजी कशी घ्यायला हवी ?
Health issue, diabetes problem, Diabetes fitness tips, Monsoon fitness tips
Health issue, diabetes problem, Diabetes fitness tips, Monsoon fitness tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : जगभरात मधुमेह हा आजार सर्वसामान्य होत चालाला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला या आजाराशी झुंज द्यावी लागते आहे.

हे देखील पहा -

मधुमेह (Diabetes) असणाऱ्या व्यक्तींनी योग्य औषधोपचार घेणे, संतुलित व सकस आहार घेणे आणि नियमितपणे व्यायामाचे वेळापत्रक तयार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतो. शारीरिक व्यायाम व मधुमेहींच्या देखभालीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. टाइप १ मधुमेहींच्या बाबतीत स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगमुळे स्नायू बळकट होतात आणि व्यायाम करताना रक्तातील साखरेची पातळी घसरण्याची शक्यता कमी होते.अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार वाढलेले वजन घेऊन व्यायामामुळेही हाडे बळकट होतात, रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल कमी होतो, वजन घटणे आणि हृदयविकाराचा धोका कमी होणे यांसारखे फायदे आपल्याला होतात.

डायबक्युरा हेल्थकेअर अँड धर्मा डायबेटिस अँड मेटॅबॉलिक क्लिनिक्सचे डायरेक्टर आणि कन्सल्टन्ट डायबेटोलॉजिस्ट डॉ. मुदित सभरवाल म्हणाले, मधुमेहग्रस्त व्यक्तींनी नियमितपणे व्यायाम करणे हे मोठेच आव्हान वाटते आणि पावसाळ्याच्या ऋतूत तर याकडे सहज दुर्लक्ष होते. रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राखायची असेल तर त्यांना घरच्याघरी नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करायला हवा. सकस आहार (Food) आणि नियमित व्यायाम यांच्यामुळे मधुमेहग्रस्त व्यक्तींना रक्तदाबामध्ये व रक्तातील कॉलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये सकारात्मक बदल झालेला दिसून येईल.

Health issue, diabetes problem, Diabetes fitness tips, Monsoon fitness tips
स्वयंपाकघरातील या मसाल्यांनी मधुमेहला नियंत्रणात ठेवा!

व्यायाम करताना आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीत होणा-या चढउतारांविषयी जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. सुरक्षितपणे व्यायाम करण्यासाठी अशाप्रकारच्या शारीरिक कामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर साखरेच्या पातळीची नोंद ठेवणे गरजेचे असते. यामुळे शरीर व्यायामाला कसा प्रतिसाद देत आहे हे दिसून येईल व त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरित्या कमी-जास्त होण्याची शक्यता टाळता येईल. आज कन्टिन्यूअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) तंत्रज्ञानांमुळे ग्लुकोजच्या पातळीची देखरेख ठेवणे सोपे झाले आहे. फ्रीस्‍टाइल लिब्रे सारखी उपकरणे वॉटरप्रुफ, प्रिक- फ्री, अर्थात सुईचा समावेश नसलेली आणि वापरण्यासाठी सुलभ आहेत.

शारीरिक हालचालींमधील सातत्य टिकविण्यासाठी मधुमेहींनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्कआऊटचे वेळापत्रक ठरविले पाहिजे. त्यात पुढील काही व्यायाम प्रकारांचा समावेश करता येईल

१.वॉल पुशअप्स : भिंतीकडे तोंड करून उभे रहा आणि तळवे खांद्यांच्या रेषेत सरळ ठेवा, प्लॅन्क स्थितीमध्ये भक्कमपणे उभे राहत व शरीराचा कमरेवरील भाग सरळ ठेवत, हात कोपरामध्ये दुडत आपली छाती भिंतीच्या दिशेने पुढे न्या. हळूहळू पुन्हा मागे जा आणि आपले बाहू सरळ करा.

२.साइड रेझस: हा व्यायाम बसून किंवा उभे राहून करता येईल. प्रत्येक हातामध्ये एक वजन घ्या. हळुहळू दोन्ही बाहू कोपरामध्ये किंचित वाकवित आपापल्या बाजूला वर उचला. बाहू खांद्यांच्या रेषेत येईपर्यंत वर उचला, ‘T’ आकार बनेल. हळुहळू बाहू पुन्हा खाली न्या व हा व्यायाम पुन्हा करा.

३.चेअर रेझेस: खुर्चीवर सरळ बसा. आपले दोन्ही बाहू फुलीच्या आकारात छातीशी दुमडून घ्या आणि मागे झुका. आता आपले बाहू सरळ रेषेत समोर नेत पाठीत ताठ व्हा व उभे रहा. पुन्हा आपल्या बसलेल्या स्थितीत जा. हा व्यायाम परत एकदा करा.

Health issue, diabetes problem, Diabetes fitness tips, Monsoon fitness tips
फादर्स डे स्पेशल : मधुमेहग्रस्त बाबाची अशी घ्या काळजी

४. बायसेप कर्ल्स: तळवे आतल्या बाजूला असतील अशा प्रकारे हात शरीराच्या बाजूंना सरळ ठेवा व प्रत्येक हातात एक वजन धरा. आता तळवे आपल्या दिशेने वळवा व एक बाहू वाकवत भार खांद्यांकडे न्या. हाच व्यायाम दुस-या हाताने करा आणि मग दोन्ही हात पुन्हा खाली घ्या.

५.ट्रायसेप एक्स्टेन्शन्स: आपला एक हात डोक्यावर घ्या म्हणजे तुमचे कोपर छताच्या दिशेने वर जाईल तर जमिनीच्या दिशेने निर्देश करणा-या दुस-या हातामध्ये वजन घ्या. ही हालचाल करताना कोपराला दुखापत होऊ नये यासाठी दुसरा हाताने आपला बाहू स्थिर ठेवा. वजन डोक्याच्या वर नेण्यासाठी आपला बाहू सरळ वर न्या. आणखी एकदा असे करा. आता दुसरा बाहू वापरून हाच व्यायाम पुन्हा करा.

या साध्यासोप्या व्यायामामुळे आपल्या शरीराची एकूणच ताकद वाढण्यास मदत होते व मधुमेहाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. मात्र कोणता व्यायामप्रकार आपल्याला सर्वाधिक साजेसा ठरेल हे समजून घेण्यासाठी व्यायाम सुरू करण्यासाठी आपल्या डायबेटॉलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com