Home Remedies For Dry Cough : कोरडा खोकला झालाय ? वेळीच व्हा सावधान होऊ शकतो हा गंभीर आजार

कोरडा खोकला झालाय? हे उपाय करुन पहा.
Home Remedies For Dry Cough
Home Remedies For Dry CoughSaam Tv

Home Remedies For Dry Cough : बाहेरचे किंवा तेलकट खाल्यानंतर आपल्या खोकला होतो. ऍलर्जीपासून ऍसिड रिफ्लक्सपर्यंत अनेक गोष्टींमुळे कोरडा खोकला होऊ शकतो.

कोरड्या खोकल्यामध्ये कोणतेही विशिष्ट कारण नाही. परंतु, सततच्या कोरड्या खोकल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो.

कोरडा खोकला हा किती काळ टिकतो यावर अवलंबून असते. व्हायरल इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला झाला असेल तर तो ८ आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. त्यामुळे कोरडा खोकला दीर्घकाळ मानला जातो, कारण तो प्रौढांमध्ये ८ आठवडे आणि लहान मुलांमध्ये ४ आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. यापेक्षा जास्त काळ खोकला हा प्राणघातक आजार आहे (Home Remedies For Dry Cough)

या आजारात फुफ्फुसातील कर्करोगाचे लक्षण असू शकते. सामान्यतः, रात्रीच्या वेळी कोरडा खोकला अधिक त्रासदायक असतो, ज्याला काहीवेळा कोरड्या खोकल्याचे सिरप देखील नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत घरगुती उपायांनी तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.

Home Remedies For Dry Cough
Benefits Of Potato Juice : बटाट्याचा रस प्यायल्याने होऊ शकते प्रतिकारशक्ती मजबूत, जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

१. गरम पाणी व मध -

Hot Water and honey
Hot Water and honeyCanva

NCBI मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, प्रौढ व १ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी मध कोरड्या खोकल्यापासून रामबाण उपाय आहे. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपली चिडचिड कमी होण्यास मदत होते तसेच घशाचा लेप होतो. आपण १ चमचा मध दिवसातून अनेक वेळा घेऊ शकतो. आपण चहा किंवा गरम पाण्यात मिसळून हे पिऊ शकता.

२. हळदी व काळी मिरी -

Turmeric and Black pepper
Turmeric and Black pepperCanva

हळदीमध्ये (Turmeric) कर्क्युमिन घटक आहेत. ज्यामध्ये दाहक-विरोधी, अँटीव्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यामुळे कोरड्या खोकल्यासह अनेक परिस्थितींमध्ये ते फायदेशीर (Benefits) आहे. काळी मिरीसोबत घेतल्यास कर्क्युमिन रक्तप्रवाहात चांगले शोषले जाते. संत्र्याच्या रसासारख्या पेयामध्ये १ चमचे हळद आणि १/८ चमचे काळी मिरी मिसळून आपण याचे सेवन करू शकतो.

३. आले व मीठ -

Ginger and Salt
Ginger and SaltCanva

आल्यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळून येतात. अशावेळी कोरड्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते. आल्याचा छोटा तुकडा घेऊन त्यावर चिमूटभर मीठ शिंपडा किंवा मध लावून दाताखाली दाबा. अशा प्रकारे आल्याचा रस हळूहळू तोंडात जाऊ द्या. सुमारे ५-७ मिनिटे ठेवल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा.

४. तूप व काळी मिरी -

Ghee and Black Pepper
Ghee and Black PepperCanva

तुपात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपला घसा मऊ होण्याचे काम होते. काळ्या मिरी पावडरमध्ये तूप मिसळून खाल्ल्यास कोरड्या खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो.

५. गरम पाणी व मीठ-

Hot Water and Salt
Hot Water and SaltCanva

मिठाच्या पाण्याने गुळणा केल्याने कोरड्या खोकल्यामुळे होणारी अस्वस्थता आणि चिडचिड कमी होण्यास मदत होईल. खारट पाणी तोंड आणि घशातील बॅक्टेरिया मारण्यास मदत करते. कोमट पाण्यात मीठ घालून गुळणा केल्यास फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com