Healthy Diet : सणासुदीनंतर आरोग्याची काळजी कशी घ्याल ? फॉलो करा 'हा' डाएट प्लान

सणासुदीनंतर, पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता.
Healthy Diet
Healthy DietSaam Tv

Healthy Diet : सणासुदीच्या काळात लोक तळलेले आणि गोडाच्या पदार्थांचे सेवन अतिरिक्त करतात. खूप प्रकारचे अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सणासुदीनंतर, पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता. या टिप्स तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवून देतील. यामुळे तुम्हाला खूप हलके वाटेल. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा (Latest Marathi News)

Healthy Diet
Diwali Detox Drink : दिवाळीत अतिरिक्त फराळाचे सेवन झाले आहे ? 'हे' पदार्थ करतील शरीराला डिटॉक्स

1.वेळेवर खा

जेवण वेळेवर खा. भूक नसेल तर हलके अन्न खा. जेवणा दरम्यान 4 ते 6 तासांचे अंतर ठेवा. मधेच भूक लागली तर ड्रायफ्रुट्स, सॅलड, फ्रूट (Fruit) सॅलड खाऊ शकता. पण भूक लागल्यावरच हे खावे. यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होते.

2. हळद पावडर आणि काळी मिरी

जेवण बनवताना शक्य तितकी हळद पावडर आणि काळी मिरीचा वापर पदार्थांमध्ये करा. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि पोषक घटक आहेत जे आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे पुरवतात.

3.लापशी

आहारात लापशी, खिचडी आणि मसूर यांसारखे हलके अन्न समाविष्ट करू शकता. याचे सेवन केल्यावर पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल.

Healthy Diet
Digital Detox: मोबाईलपासून अंतर राखणे का महत्त्वाचे आहे

4. लिंबू पाणी

रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. जास्त बर्फाचे पाणी आणि थंड पाणी न पिण्याचा प्रयत्न करा. लिंबू पाण्यात मध मिसळून सेवन करू शकता.

5. हळदीचे दूध

रात्री झोपताना हळदीचे (Turmeric) दूध घ्यावे. एक ग्लास दुधात चिमूटभर हळद मिसळा. तुम्ही त्यात मधही घालू शकता. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोपही येईल.

हे पदार्थ खाऊ नका

खूप थंड, गोठवलेले आणि तळलेले अन्न खाणे टाळा. त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला खूप अस्वस्थ वाटू शकते. मैदयापासून बनवलेल्या वस्तू जसे की ब्रेड, बन्स, पराठे आणि बेकरीच्या वस्तूंचे सेवन करू नका.

  • आवळा

दररोज 1 ते 2 आवळा खा. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे तुमच्या शरीराला संसर्गापासून वाचवण्याचे काम करते.

  • हर्बल चहा प्या

हर्बल चहा घ्या. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यास देखील मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com