Heart Attack Risk: वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, वेळीच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा

High cholesterol Causes: हृदयविकाराच्या झटक्यासाठी कोलेस्टेरॉलदेखील जबाबदार असते.
Heart Attack
Heart AttackSaam Tv

Heart Attack : हल्ली हृदयविकाराच्या झटका हा सर्वसामान्य आजारासारखाच वाटू लागला आहे. मागच्या काही काळापासून हृदयविकाराचे अनेक रुग्ण सापडत आहे पण हा नेमका कसा येतो. यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

हृदयविकाराच्या झटक्यासाठी कोलेस्टेरॉलदेखील जबाबदार असते. कोलस्टेरॉलसाठी एलडीएल कोलेस्टेरॉल हा एक गलिच्छ पदार्थ आहे ज्याचे शरीरात कोणतेही कार्य नसते. हे एचडीएल कोलेस्टेरॉल (चांगले कोलेस्टेरॉल) पेक्षा वेगळे आहे. यकृत पुरेसे चांगले आणि आवश्यक कोलेस्ट्रॉल तयार करते. पण चरबीयुक्त अन्न खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते आणि शिरांमध्ये जमा होते.

Heart Attack
Winter Heart Care : हिवाळ्यात हार्टअटॅकचे प्रमाण वाढते, त्यापासून बचाव कसा करायचा?

जंक फूड, तेलकट पदार्थ खाल्यामुळे वाईट कॉलेस्टेरॉलचे प्रमाण शरीरात अधिक वाढते त्याचा परिणाम हृदयावर होतो तर HDL हे चांगले कॉलेस्टेरॉल असते. हे आवश्यक आणि चांगल्या कॉलेस्टेरॉला लिव्हर मध्ये मर्यादित स्वरूपात निर्माण करत असते. तूप, डेअरी प्रोडक्टस, मांस, आईस्क्रीम, खोबरेल तेल,पिझ्झा या पदार्थत फॅटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा पदार्थाचे सेवन केल्यास शरीरात घाणेरडे कॉलेस्टेरॉल वाढते. त्याला हाय लीपोप्रोटीन कॉलेस्टेरॉल असे म्हणतात यामुळे नसांमध्ये चीपचीपा पदार्थ एका जागी गच्च जमून बसते

याचे प्रमाण वाढल्याने ते रक्तवाहिन्यांना बंद करतात आणि रक्त प्रवाहाबरोबर होत नाही. बऱ्याचदा हा पदार्थ तुटून हृदयापर्यंत पोहचतो त्याचा परिणाम शिरा वर होऊन शिरा बंद होतात आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो.

1. सफरचंद

Apple
Applecanva

एका सफरचंदामध्ये १ग्रॅम सॉल्यूबस फायबर असते त्यामुळे दररोज तुमच्या आहारात १ सफरचंदचा समावेश केल्याने घाणेरड्या कॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. तुम्ही दररोज २ ते ३ सफरचंद (Apple) आरामत खाऊ शकता. सफरचंदाचे रोज सेवन केल्याने इतर आजार ही नाहीसे होते. त्यामुळे सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले असतात.

2. गाजर

carrot
carrotcanva

गाजरचे सेवन कॉलेस्टेरॉल कंट्रोलसाठी फायदेशीर (Benefits) आहे.गाजर मध्ये २.४ ग्रॅम फायबर असते.म्हणून गाजर चे सेवन केल्याने नसांन मध्ये जमलेली घाण कमी होते.थंडीत गाजर सहज मिळते त्यामुळे सिझन मध्ये गाजरचे सेवन करावे.

3. मटार ओट्स आणि इसबगोल चा उपयोग

oats
oatscanva

मटार ओट्स आणि इसबगोल यामध्ये सॉल्यूबस फायबर असते. मटार आणि ओट्स आपण बनवून खाऊ शकतो,तर इसबगोल थंड पाण्यात (water) भिजवून खायचे त्यामुळे कॉलेस्टेरॉल कंट्रोल मध्ये राहते आणि नसांन मध्ये जमलेली घाण नाहीशी होते.

इतर गोष्टींचा आहारात समावेश करा

फायबर वाले पदार्थ खाल्यावर कॉलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही. NCBI वर प्रकाशित केलेल्या एका संशोधनुसार फायबत्युक्त गोष्टींचा आहारात समावेश करावा त्यामुळे खराब कॉलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही आणि आपण खूप आजारापासून दूर राहतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com