Hypertensive Heart Disease : उच्च रक्तदाबामुळे वाढतो हृदयावरील ताण ? हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज म्हणजे काय ?

High Blood Pressure : उच्च रक्तदाब हा माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त असतो.
Hypertensive Heart Disease
Hypertensive Heart DiseaseSaam Tv

Hypertensive Heart Disease Symptoms : हल्ली भारतात उच्च रक्तदाबाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहे. उच्च रक्तदाब हा माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त असतो. यामुळे आपल्या श्वास घेण्यास अधिक त्रास होतो.

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा (Heart Attack) आजार होतो, ज्याला हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावरील ताण (Stress) वाढू शकते, ज्यामुळे हृदयाचे विविध आजार (Disease) बळावतात. हायपरटेन्सिव्ह हृदयरोग हा एक धोकादायक वैद्यकीय विकार आहे जो कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD), हार्ट फेल्युअर आणि हृदयाचे स्नायूंवर दुष्परिणाम करू शकतो. हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज हा सुमारे 25% हृदय निकामी करते.

Hypertensive Heart Disease
High Blood Pressure : मीठाच्या अतिरेकामुळे वाढतो उच्च रक्तदाब त्रास; जडू शकतात अनेक गंभीर समस्या, ही लक्षणे दिसल्यास वेळीच व्हा सावध !

एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे म्हणतात कोरोनरी आर्टरी डिसीज हा आणखी एक प्रकारचा हायपरटेन्सिव्ह हृदयरोग आहे. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. जीवनशैलीत बदल केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या रोखण्यात मदत होऊ शकते. हायपरटेन्सिव्ह हृदयरोगावर उपचार करण्यासाठी औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेसारख्या उपचार पध्दती वापरल्या जाऊ शकतात.

1. हे घटक कारणीभूत

  • हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज म्हणजे उच्च रक्तदाबामुळे होणारी हृदयाची स्थिती.

  • उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण पडतो यामुळे हार्ट फेल्युअरचा धोका उद्भवू शकतो.

  • डाव्या व्हेंट्रीक्युलर हायपरट्रॉफीच्या रूग्णांमध्ये हृदयासंबंधीत विकृती आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते.

  • उच्च रक्तदाबामुळे हृदयाला रक्तवाहिन्यांमधून रक्त पंप करण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतात.

  • जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो किंवा तुमच्या हृदयाच्या स्नायूचा काही भाग उच्च रक्तदाबामुळे रुंद होतो.

Hypertensive Heart Disease
Cholesterol Causing Food : हे 3 पांढरे पदार्थ शरीरासाठी 'विष'च; झपाटयाने वाढते कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचाही धोका !

2. हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीजचे दुष्परिणाम कोणते?

  • हार्ट फेल्युअर

  • अरिथमिया

  • स्ट्रोक

  • इस्केमिया (हा एक प्रकारचा हृदयरोग)

  • अनपेक्षितपणे हृदयविकारामुळे होणारा मृत्यू

3. कोणाला हायपरटेन्सिव्ह हृदयरोग होण्याची शक्यता असते?

  • उच्च रक्तदाब हा हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीजला कारणीभूत घटक आहे.

  • जर एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असेल, व्यायामाचा अभाव असेल, धूम्रपानासारखी वाईट सवय असेल

  • तसेच चरबीयुक्त आणि कोलेस्टेरॉल अधिक असलेले अन्नपदार्थांचे अतिरिक्त सेवन असेल त्या व्यक्तीला हायपरटेन्सिव्ह हृदयरोगाचा धोका अधिक असतो.

  • जर तुमच्या घरात पूर्वीपासून हा आजार असल्यास हायपरटेन्सिव्ह हृदयरोग होण्याची शक्यता अधिक असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते.

  • महिला आणि पुरुष दोघांनाही या आजाराचा धोका असतो. हृदयविकाराचा धोका हा तुमच्या वयानुसार वाढत जातो.

Hypertensive Heart Disease
Diabetes Control In Summer Season : उन्हाळ्यात शुगर लेव्हल खरेच वाढते का? जाणून घ्या डॉक्टरांकडून, लगेच होईल कंट्रोल

4. हायपरटेन्सिव्ह हृदयरोगास कसे दूर ठेवाल?

  • हायपरटेन्सिव्ह हृदयरोग टाळण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक म्हणजे तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करणे आणि त्याचे नियंत्रण करणे.

  • संतुलित आहाराचे सेवन करुन तुमचे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे आवश्यक आहे.

  • तणावापासून दूर राहणे गरजेचे असून हृदयविकार टाळण्यासाठी या सर्वात प्रभावी दोन पद्धती आहेत.

  • निरोगी वजन राखणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

Hypertensive Heart Disease
Rupali Bhosale: अगं बाई, हा गुलाब नेमका कुणासाठी ?
  • हायपरटेन्सिव्ह हृदयविकार हा उच्च रक्तदाबामुळे होणारा विकार आहे.

  • उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते परिणामी गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

  • लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी (LVH) हा एक प्रकारचा हायपरटेन्सिव्ह हृदयरोग आहे

  • ज्यामध्ये उच्च रक्तदाब हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडते, यामुळे हृदय जाड आणि मोठे होते.

  • याचा परिणाम हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर होतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com