Hiroshima Day 2022 : क्षणार्धात सगळं काही संपलं, ६ ऑगस्ट या दिवशी नेमके काय झाले होते?

हिरोशिमा म्हणजे काय ? येथे कागदी क्रेन बनवण्याची प्रथा का आहे ?
Hiroshima day 2022, Hiroshima bomb date
Hiroshima day 2022, Hiroshima bomb dateब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hiroshima day 2022 : ६ ऑगस्ट हा हिरोशिमा दिन म्हणून स्मरणात ठेवला जातो. या दिवशी अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर 'लिटल बॉय' नावाचा युरेनियम बॉम्ब टाकला. या बॉम्बच्या धडकेने १३ चौ.कि.मी. पर्यंत विध्वंस झाला होता.

हे देखील पहा -

हिरोशिमाच्या ३.५ दशलक्ष लोकसंख्यापैकी एक लाख चाळीस हजार लोक एका क्षणात मरण पावली होती त्यात काही सैनिक होते तर काही सामान्य नागरिक, लहान मुले, वृध्द व महिला होत्या. यानंतरही अनेक वर्षे किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे असंख्य लोकांचा मृत्यू होत होता. इतकेच नाही तर अमेरिका इतक्यावर थांबली नाही तर तिने अजून एक प्रकारच्या बॉम्बचे परिणाम त्यांना आजमवायचे होते. त्यामुळे या अमानुष विध्वंसाच्या तीन दिवसांनंतर ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर 'फॅट मॅन' नावाचा प्लुटोनियम बॉम्ब टाकण्यात आला, ज्यात स्फोट आणि उष्णतेमुळे अंदाजे ७४,००० लोक मरण पावले. त्यातही बहुतांश निष्पाप नागरिक होते.

जपानने अण्वस्त्रे नसण्याचे धोरण का स्थापित केले?

हिरोशिमा हे जपानमधील (Japan) एक शहर आहे. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुध्दात अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता, ज्यामुळे संपूर्ण शहर (City) उद्धवस्त झाले होते. आजही या परिणामाला तिथली प्रत्येक व्यक्ती बळी पडत आहे. नागासाकी या जपानी शहरावरही अणुबॉम्बने हल्ला करण्यात आला. याचा परिणाम म्हणून जपानने कधीही अण्वस्त्रांची निर्मिती न करण्याचे धोरण प्रस्थापित केले आहे.

Hiroshima day 2022, Hiroshima bomb date
Bones Health Tips : वाढत्या वयानुसार होणार नाही हाडांचा त्रास, आजच या पदार्थांचा समावेश करा आहारात

हिरोशिमामध्ये कागदी क्रेन का बनवल्या जातात?

आज हिरोशिमा हे जपानमधील प्रमुख शहर आहे. हिरोशिमामध्ये सुमारे ११,९६,२६४ पेक्षा अधिक लोक राहतात. हिरोशिमामधील बरेच लोक शांततेसाठी कागदाच्या क्रेन बनवतात. याचे कारण असे की, जेव्हा हिरोशिमावर बॉम्ब टाकण्यात आला तेव्हा सदाको सासाकी नावाच्या मुलीला हल्ल्यातून उत्सर्जित होणाऱ्या धोकादायक रेडिएशनमुळे रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यावेळी एक हजार क्रेन बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता कारण असे म्हटले जाते की, जपानमध्ये या हजार क्रेन बनवल्यानंतर आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात. सदकोने हजार क्रेन बनवल्या मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि दुर्दैवाने सदकोचा मृत्यू झाला. हिरोशिमामधील रस्त्यांसाठी लोक अजूनही कागदी क्रेन बनवतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com