Home Remedy : टूथपेस्टने फक्त दातच नाही तर घरातील या वस्तू देखील चमकतील, 'हे' उपाय करुन पहा

आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींसाठी तुम्हाला रोजच्या रोज टूथपेस्टचा वापर करता येऊ शकतो.
Home Remedy, Toothpaste benefits
Home Remedy, Toothpaste benefitsSaam T v

Home Remedy : टूथपेस्ट हा आपल्या प्रत्येकाच्या घरातील अविभाज्य भाग आहे. याचा उपयोग आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर दात घासण्यासाठी अर्थात दातांची काळजी घेण्यासाठी करावा लागतो.

लहानपणी अनेकांना टूथपेस्ट खाण्याची सवय असते. लहानपणी ब्रशला टूथपेस्ट लावताना आई- वडिलांची नजर चुकवून पेस्ट खाल्ली जायची. जस जसे मोठे होत गेलो तेव्हा टूथपेस्ट ही फक्त दात घासण्यापूरतीच मर्यादित राहिली. याच टूथपेस्टचा वापर किती वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो याची आपल्याला कल्पना आहे का? आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींसाठी तुम्हाला रोजच्या रोज टूथपेस्टचा वापर करता येऊ शकतो.

टूथपेस्ट अशा घटकांपासून बनवली जाते ज्यात आपले दात साफ करण्याचे गुणधर्म असतात. असे अनेक घटक आपल्याला दात पांढरे करणाऱ्या टूथपेस्टमध्ये आढळतात जे अगदी कठीण डागही सहज काढून टाकतात. मग तो उपयोग आपल्या त्वचेसाठी (Skin) असो अथवा आपल्या दागिन्यांसाठी असला तरी याचा वापर करता येतो. चला टूथपेस्टच्या अनोख्या ट्रिक्सची माहिती जाणून घेऊया.

Home Remedy, Toothpaste benefits
Diabetes control tips : रक्तातातील साखर नियंत्रणात ठेवायची आहे तर, मधुमेहाच्या रुग्णांनी जेवल्यानंतर करा 'हे' काम

फोन कव्हर -

आपल्या फोनच्या कव्हरवरील डाग काढणे कठीण आहे. टूथपेस्टने फोनचे कव्हर साफ करण्यासाठी फायदेशीर ठरेल. कव्हरला टूथपेस्ट लावून २ ते ३ मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने (Water) धुवा. असे केल्याने आवरणावरील पिवळे डागही निघून जातील.

लिपस्टिकचे डाग -

कपड्यांवर लिपस्टिकचे डाग पडले तर ते काढणे खूप अवघड असते, जर आपण ते काढण्याचा प्रयत्न केला तर अनेक वेळा तो जास्त ठिकाणी पसरतो. कपड्याच्या ज्या भागात डाग आहे त्या ठिकाणी टूथपेस्ट लावा, पेस्ट काही वेळ तशीच राहू द्या, त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा, लिपस्टिकचे डाग निघून जातील.

Home Remedy, Toothpaste benefits
Health Tips : मुलांच्या छातीत सतत जळजळ होतेय ? कमी वयात अॅसिडिटीचा त्रास तर नाही ना ? हे घरगुती उपाय करुन पहा

चहाच्या खुणा -

अनेक वेळा चहाचा कप ठेवल्यानंतर काचेच्या टेबलावर खुणा राहतात, बराच वेळ साफ न केल्यास ते डाग काढणे कठीण जाते. टूथपेस्टचा वापर करुन डाग सहज साफ करता येतात.

दागिन्यांचा काळेपणा -

चांदीचे दागिने जुने झाले तर ते काळे पडतात आणि गंजतात. ते टूथपेस्टने साफ करता येतात, ही युक्ती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. पायात घातलेल्या पैंजण थोड्याच काळात काळ्या होतात, टूथपेस्ट लावून त्यांची चमक परत आणता येते. दागिन्यांवर टूथपेस्ट २० मिनिटे लावल्यानंतर ब्रशने साफ केल्याने सर्व काळेपणा दूर होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com