
Honor कंपनी भारतात एक नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनचे नाव Honor 90 5G आहे. हा फोन भारताता १४ सप्टेंबरला लाँच होणार आहे. फोनमध्ये फिचर्स डिस्पले , कॅमेरा आणि डिझाइनवर काम करण्यात आले आहे. हा फोन ऑनलाईन अॅमेझॉनवर विकला जाणार आहे. आम्ही तुम्हाला फोनमधील फिचर्सबद्दल माहिती देणार आहोत.
हा फोन भारतीय युजर्ससाठी फोटोग्राफीमध्ये नवीन अनुभव देईल असा दावा कंपनी करत आहे. कंपनीला या फोनमध्ये फ्लॅगशिप अनुभव द्यायचा आहे. कॅमेरा आणि डिझाइनच्या बाबतीत फोन उत्तम असेल. असं कंपनीचे म्हणणे आहे.
Honor 90 5G च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात अत्याधुनिक वक्र फ्लोटिंग डिस्प्ले देण्यात येणार आहे. या डिस्प्लेमुळे युजर्सचा पाहण्याचा अनुभव तर उत्तम होईलच. यामुळे युजर्सच्या डोळ्यांनाही जास्त त्रास होणार नाही. Honor 90 5G मध्ये 200MP मुख्य कॅमेरा असेल, तर 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.
Honor 90 5G स्पेसिफिकेशन
NBTच्या वृत्तानुसार, Honor च्या आगामी स्मार्टफोनचा टीझर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लाइव्ह करण्यात आला आहे. हा फोन अॅमेझॉनवरुन विकला जाणार आहे. फोनमध्ये 1.5k डिस्प्ले रिझोल्यूशनचा सपोर्ट असेल. तसेच, 1600 निट्सची पीक ब्राइटनेस ऑफर दिली जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 3840Hz अल्ट्रा-फाईन डायमेंशनल डिस्प्ले तंत्रज्ञानासह बाजारात येईल. हा फोन Android 13 आधारित MagicOS 7.1 वर काम करेल.
फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली जाणार आहे. मात्र, फोनमध्ये कोणता प्रोसेसर वापरला जाईल. याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. वृत्तानुसार, Honor 90 5G हा प्रीमियम परवडणारा स्मार्टफोन असेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.