New Smartphone: 200MP दमदार कॅमेरा, Honor 90 5G स्मार्टफोन 10 हजारांनी झाला स्वस्त; उद्यापासून सुरु होणार सेल...

Honor 90 5G: 200MP दमदार कॅमेरा, Honor 90 5G स्मार्टफोन 10 हजारांनी झाला स्वस्त; उद्यापासून सुरु होणार सेल...
Honor 90 5G
Honor 90 5GSaam Tv

Honor 90 5g Price In India :

Honor 90 5G सह जवळपास तीन वर्षांनंतर Honor ने भारतीय बाजारपेठेत पुन्हा प्रवेश केला आहे. हा फोन 200-मेगापिक्सेल कॅमेरासह येतो आणि यात फास्ट चार्जिंग बॅटरी देण्यात आली आहे. भारतात फोनची विक्री सोमवार, 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. लॉन्चच्या वेळी कंपनीने सांगितले होते की, भारतात फोनला दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Honor 90 5G
Ganesh Chaturthi त Vivo ची जबरदस्त ऑफर, 'या' स्मार्टफोन्सवर देत आहे 8,500 रुपयांपर्यंत सूट

कंपनीने Honor 90 5G चे दोन प्रकार भारतात लॉन्च केले आहेत. त्याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 37,999 रुपये आहे तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 39,999 रुपये आहे. हा फोन डायमंड सिल्व्हर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. (Latest Marathi News)

मोफत मिळणार इअरबड्स

फोनची विक्री 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होत आहे. ग्राहक हा फोन Amazon वरून खरेदी करू शकतात. लॉन्च ऑफरचा भाग म्हणून, कंपनी 3,000 रुपयांचा कॅशबॅक, 2,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि फोनवर 5,000 रुपयांची लॉन्च सूट देत आहे, त्यानंतर 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये असेल आणि 12GB रॅम मॉडेलची किंमत 29,999 रुपये असेल. कंपनी फोनसोबत फ्री इयरबड देखील देत आहे.

Honor 90 5G
Government Schemes: मुलींसाठी जबरदस्त 5 सरकारी योजना; शिक्षणापासून लग्नापर्यंत, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही...

Honor 90 5G चे स्पेसिफिकेशन

फोन 6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येतो, जो 1.5K (2664x1200 पिक्सेल) रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसह येतो. हा फोन Android 13 OS वर आधारित Magic OS 7.1 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये ऑनर इमेज इंजिन सपोर्टसह 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह 12-मेगापिक्सेल सेन्सर आणि मॅक्रो लेन्ससह 2-मेगापिक्सेलचा सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेल सेन्सर आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com