Hormonal Imbalance : या सवयींमुळे तुम्ही होऊ शकता हार्मोनल असंतुलनाचा बळी, जाणून घ्या

Causes Of Hormonal Imbalance : आजच्या खराब जीवनशैलीमुळे अर्ध्याहून अधिक लोकसंख्या हार्मोनल असंतुलनाच्या समस्येशी झुंजत आहे.
Hormonal Imbalance
Hormonal ImbalanceSaam Tv

Prevention of imbalance :

तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु आजच्या खराब जीवनशैलीमुळे अर्ध्याहून अधिक लोकसंख्या हार्मोनल असंतुलनाच्या समस्येशी झुंजत आहे.

हार्मोनल असंतुलनामुळे अनेक गंभीर आजार (Diesease) होतात आणि त्याचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. हार्मोनल असंतुलनाची समस्या केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही आढळते. हार्मोनल असंतुलनाचे कारण आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घेऊया.

Hormonal Imbalance
Hormonal Drink For PCOS: अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त आहात? पीसीओएसची समस्या देखील आहे? हे हार्मोनल ड्रिंक नक्की ट्राय करुन पाहा

हार्मोनल असंतुलनाचे कारण

हार्मोनल असंतुलनाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोषक तत्वांचा अभाव. वेळेवर न खाल्ल्याने हार्मोनल बॅलन्सही बिघडतो.

झोपेच्या कमतरतेमुळे देखील हार्मोनल (Hormal) असंतुलनाची समस्या उद्भवू शकते.

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत व्यायाम आणि योगासने नसली तरी तुम्ही हार्मोनल असंतुलनाचे बळी होऊ शकता.

तणाव आणि नैराश्यामुळे लोक हार्मोनल असंतुलनाला बळी पडतात.

हार्मोनल असंतुलन कसे दुरुस्त करावे?

तुमची जीवनशैली सुधारा आणि झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ निश्चित करा. लक्षात ठेवा की तुम्ही किमान 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे.

आहारात सुधारणा करून हार्मोनल असंतुलन देखील दुरुस्त केले जाऊ शकते. बाहेरचे अन्न खाणे टाळा आणि घरी शिजवलेले निरोगी अन्न वेळेवर खा.

आपल्या आहारात (Diet) फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील आणि तुम्ही निरोगी राहाल.

दररोज व्यायाम आणि योगासने करण्याची सवय लावा. व्यायाम केल्याने लठ्ठपणापासून बचाव तर होतोच शिवाय अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो.

दालचिनीचा चहा प्या, हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com