Women's Health : रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांनी आपले आरोग्य कसे जपायला हवे ?

काहींच्या बाबतीत बदलाच्या या काळामध्ये पाळी अनियमितपणे येणे, हॉट फ्लशेस, घामाघूम होणे, झोपेचे तंत्र बिघडणे, मनोवस्थेमध्ये मोठे चढउतार होणे, चिडचिड होणे, सांधे आणि पाठदुखी व अशी अनेक प्रकारची लक्षणे अनुभवास येतात.
Women's Health
Women's HealthSaam Tv

Women's Health : स्त्रियांची मासिक पाळी बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हटले जाते. महिन्याला महिना किंवा २७ ते ३० दिवसांचा असणारा मासिक पाळीचा हा कालावधी वयाच्या ४५ व्या वयानंतर हळूहळू बंद होऊ लागते.

रजोनिवृत्तीच्या या काळात स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत बरेच बदल घडतात. मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्तीच्या काळ प्रत्येक महिलेवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतो.

Women's Health
Ovarian cancer : सावधान ! ग्रामीण भागात का वाढतोय गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ? 'ही' आहेत लक्षणे

काहींच्या बाबतीत बदलाच्या या काळामध्ये पाळी अनियमितपणे येणे, हॉट फ्लशेस, घामाघूम होणे, झोपेचे तंत्र बिघडणे, मनोवस्थेमध्ये मोठे चढउतार होणे (मूड स्विंग्ज), चिडचिड होणे, सांधे आणि पाठदुखी व अशी अनेक प्रकारची लक्षणे अनुभवास येतात.

अंत:स्त्रावांच्या पातळीमध्ये होणा-या बदलांना म्हणजे हार्मोनल चेंजेसना तर रजोनिवृत्तीपूर्व काळापासून अर्थात पेरिमेनोपॉजच्या दरम्यानच सुरुवात झालेली असते व हे बदल चार वर्षांपर्यंत किंवा कधी-कधी तर दशकभरही जाणवत राहतात.

Women's Health
Stomach Cancer : सतत पोट दुखतयं ? 'ही' लक्षणे तर दिसत नाही ना, असू शकतो पोटाचा कर्करोग

वयाच्या या टप्प्याचे व्यवस्थापन करण्यासाठी समग्र दृष्टिकोन स्वीकारल्यास महिलांना अवघडलेपणापासून आराम मिळेल आणि आपले आरोग्य जपता येईल. नोकरीसाठीची मुलाखत देण्यापासून ते आई-बाबा बनण्यापर्यंतच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला सामोरे जाताना आपण जशी काही गोष्टींची तयारी करतो, तशीच तयारी या टप्प्यासाठीही करणे ही अधिक आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. अशावेळी स्त्रियांनी आहारात या पदार्थांचे सेवन करायला हवे.

या पदार्थांचा समावेश करा

Women's Health
Irregular Periods : मासिक पाळी ४० दिवसानंतर आली ? चिंतेचे कारण की, गंभीर समस्या

- फळे आणि भाज्या :

यात जीवनसत्वे (Vitamins), खनिजे आणि अँटिऑक्सिडंट् असायला हवे. वर्षभरात मिळणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करायला हवे.

- भरपूर फायबर असलेले आणि कॅल्शियम व ड जीवनसत्वाने समृद्ध पदार्थ :

हिरव्या पालेभाज्या, राजमा आणि तृणधान्ये यांसारख्या भरपूर प्रमाणात फायबर असलेल्या पदार्थांमुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकेल. दुग्धजन्य पदार्थ आणि ओमेगा –३ फॅटी आम्लांनी समृद्ध पदार्थ हे पोषणाचे उत्तम स्त्रोत मानले जातात.

हे पदार्थ टाळा

- चरबीयुक्त मांस आणि प्रक्रिया केलेले अन्न :

फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ (Food), प्रक्रिया केलेले स्नॅक्स आणि मांस यांच्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीराला फुगा आल्यासारखे वाटू शकते. या पदार्थांमुळे कॉलेस्ट्रोलच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो किंवा त्यातून हार्ट अटॅकचा धोका वाढतो. शिवाय मसालेदार पदार्थांचे सेवन हॉट फ्लॅशेससारख्या लक्षणांना निमित्त ठरू शकते.

Women's Health
Irregular Periods : प्रत्येक महिन्याला तुमच्या मासिक पाळीची तारीख का बदलते ? असू शकते 'हे' गंभीर कारण

- अल्कोहोल :

अल्कोहोलच्या नियमित सेवनामुळे मेनोपॉजच्या लक्षणांची तीव्रता वाढू शकते, झोप बिघडू शकते आणि मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्याही अधिक तीव्रपणे जाणवू शकतात.

- कॅफीन :

कॅफिनच्या प्रभावामुळे हॉट फ्लेशेस होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी गरम पेयाचा एखादा इतर पर्याय शोधणे उत्तम

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com