त्वचेनुसार कोरफडचा वापर असा करा !

कोरफडचा वापर हा चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केला जातो.
त्वचेनुसार कोरफडचा वापर असा करा !
Benefits of Aloe vera gel, Skin care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरफडचे हे जितके शरीरासाठी चांगले आहे तितकेच ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. कोरफडचा वापर हा चमकदार त्वचा (Skin) मिळवण्यासाठी केला जातो.

हे देखील पहा -

कोरफडीत व्हिटॅमिन (Vitamins) ‘ए’, ‘सी’, ‘बी१’, ‘बी२’, बी३’, ‘बी६’, फॉलिक अँसिड हे घटक आहेत. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केल्यास त्वचेसाठी फायदा होतो.

त्वचेसाठी कोरफडचे फायदे

- कोरफड त्वचेला मॉइश्चरायझ करते कारण त्यात भरपूर आर्द्रता असते. त्वचेच्या जळजळीपासून आराम देते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट मुरुमे आणि डागांशी लढण्यास मदत करते. कोरफड मधील अँटी-एजिंग आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत.

१. कोरड्या त्वचेसाठी आपण कोरफडचे जेल, मध, काकडीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा व १५ मिनिटांनी थंड पाण्याने (Water) धुवा.

Benefits of Aloe vera gel, Skin care
चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरेल ही औषधी वनस्पती !

२. तेलकट त्वचेसाठी आपण कोरफडच्या जेलात टी ट्री तेलाचे काही थेंब मिसळून रात्रभर चेहऱ्यावर राहू द्या. कोमट पाण्याने धुवा

३. मऊ त्वचेसाठी कोरफडचे जेल, केळ व गुलाब जलचे काही थेंब घालून पेस्ट तयार करा व चेहऱ्याला लावल्यास फायदा होईल.

४. कोरफड सूर्यप्रकाशापासून मुक्त ठेवण्यासाठी व त्वचेवरील जखमा भरण्यासाठी फायदेशीर ठरते.

कोरफड वापरण्याच्या इतर पध्दती

- कोरफडीच्या पानाचा तुकडा कापून त्याचे जेल त्वचेवर लावू शकतो.

- हे जेल आपण फेस मास्कवर म्हणूनही वापरु शकतो.

- बाजारात उपलब्ध असलेले एलोवेरा जेल देखील आपण वापरू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com