आवळ्याच्या बियांचा आरोग्यासाठी होणारा फायदा

चवीला आंबट, तुरट व काही अंशी गोड असणारा आवळा आपल्या सर्वाना आवडतो.
आवळ्याच्या बियांचा आरोग्यासाठी होणारा फायदा
Benefits of amala seedsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आवळ्यात व त्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक तत्व आहे. आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग केसांच्या मजबूतीसाठी किंवा त्वचेवर चमक आणण्यासाठी होतो.

हे देखील पहा-

चवीला आंबट, तुरट व काही अंशी गोड असणारा आवळा आपल्या सर्वाना आवडतो. आवळा खाल्ल्यानंतर त्याच्या बिया आपण फेकून देतो. आवळ्यात व्हिटॅमिन (Vitamins) बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, कॅरोटीन, लोह आणि फायबर यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. जितका फायदा आपल्याला होतो तितकाच फायदा त्याच्या बियांपासूनही होतो. आवळ्याच्या बियांचा फायदा आपल्या आरोग्यावर कसा होतो हे पाहूया.

आवळ्याच्या बियांचा आरोग्यावर होणारा फायदा -

१. आपल्याला बद्धकोष्ठता, अपचन किंवा आम्लपित्ताची समस्या असेल तर आवळ्याच्या बियांचा पावडर गुणकारी ठरू शकते. ही पावडर कोमट पाण्यात (water) टाकून पिता येईल त्यामुळे आराम मिळेल.

Benefits of amala seeds
या ड्रायफ्रुट्सचे आहारात सेवन करा,वजन कमी करण्यास होईल मदत

२. त्वचेशी संबंधित समस्यांसाठी आपण आवळ्याच्या बियांचा वापर करु शकतो. यासाठी खोबऱ्याच्या तेलात आवळ्याच्या सुक्या बिया घालून त्याची पेस्ट तयार करु शकतो. ही पेस्ट मुरुमांवर लावल्यास त्याचा फायदा होईल.

३. उन्हाळ्यात अनेकदा आपल्याला नाकातून अति उष्णतेमुळे रक्त येऊ लागते. त्यामुळे हा त्रास आणखी वाढू लागतो. अशा स्थितीत आवळ्याच्या बियापासून बनवलेल्या पावडरची पेस्ट तयार करून डोक्याला लावावी.

४. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मसालेदार अन्न (Food) किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सतत उचकी येऊ लागते. अशावेळी आवळ्याच्या बियांची पावडर मधात मिसळून खाल्ल्यास उचकीपासून लवकर आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com