Take Care of Contact Lenses: डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या ही बाब, अन्यथा पडेल महागात

Contact Lens Care: तुम्ही जर चुकीचे लेन्स वापरत असाल तर काय होऊ शकतं जाणून घ्या...
Contact Lenses Side Effects
Contact Lenses Side EffectsSaam Tv

अक्षय बडवे

Eye Care Tips: चष्मा नको म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स (contact lens) लावण्याकडे तरुणाईचा कल सध्या झपाट्याने वाढला आहे. आजकाल लोक आपले सौंदर्य टिकवण्यासाठी चष्म्याऐवजी लेन्सचा वापर करतायत. परंतु हेच कॉन्टॅक्ट लेन्स काही विशिष्ट केमिकलपासून बनवल्या जात असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. तुम्ही जर चुकीचे लेन्स वापरत असाल तर काय होऊ शकतं जाणून घ्या... (Latest Marathi News)

गेल्या काही वर्षांपासून लोक डोळे सुंदर दिसावेत म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. लग्न, पार्टी, कोणत्याही कार्यक्रमात इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी हल्ली तरुणाई या कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करते. परंतु या कॉन्टॅक्ट लेन्स वेगवेळ्या केमिकल्सपासून बनवल्या जात असल्याने तुम्हाला अनेक मोठे आजार होण्याचा धोका वाढतोय.

शास्त्रज्ञांना १८ लोकप्रिय कॉन्टॅक्ट लेन्समध्ये कार्बनिक फ्लोरीन सर्वात उच्च पातळी आढळली आहे. लेन्स चुकीचे वापरले तर काय होऊ शकतं हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया..

Contact Lenses Side Effects
Government On WhatsApp Fraud: व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची फसवणूक रोखण्यासाठी सरकराने उचले महत्त्वाचे पाऊल...

इतकचं काय तर एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील अनेक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स या मोठ्या प्रमाणात विषारी आणि कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपासून बनलेल्या असतात. या वेळी प्रत्येक कॉन्टॅक्ट लेन्समध्ये पॉलीफ्लोरोआकाइल पदार्थाच्या (पीएफए) एका मार्करमध्ये कार्बनिक फ्लोरीनची उच्च पातळी आढळली आहे.

यावरून जर खूप वेळ तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केल्यास शरीरातील कॅन्सरच्या पेशी सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कॅन्सरचे शिकार होऊ शकता असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र या लेन्सची काळजी काय घ्यावी ते पण पहा...

Contact Lenses Side Effects
Reasons Of Divorce : लग्न का तुटते ? घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे ? जया किशोरीने दिला जोडीदारासोबत सुखी राहण्याचा मंत्र

कॉन्टॅक्ट लेन्सशी संबंधित अनेक संशोधन सध्या सुरू आहेत आणि यात आणखी संशोधन होण्याची गरज आहे, पण तुम्ही जर लेन्स वापरत असाल तर काळजी घ्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काँटॅक्ट लेन्सची निवड करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com